
चालू घडामोडी 21, डिसेंबर 2024 | SLINEX नौदल सराव | SLINEX Naval Exercise

SLINEX नौदल सराव
SLINEX Naval Exercise
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) SLINEX नौदल सराव खालील पैकी कोणत्या देशांमधील संयुक्त नौदल सराव आहे ?
1) भारत आणि अमेरिका
2) भारत-इंडोनेशिया
3) भारत आणि सिंगापूर
4) भारत आणि श्रीलंका
उत्तर : भारत आणि श्रीलंका
SLINEX नौदल सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारत आणि श्रीलंका यांच्यामधील द्विपक्षीय नौदल सराव उपक्रमा अंतर्गत SLINEX हा नौदल सराव नुकताच पार पडला.
• 17 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान हा सराव पार पडला.
SLINEX नौदल सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
• या सरावाचे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे करण्यात आले होते.
• 17 ते 18 डिसेंबर दरम्यान बंदर टप्पा आणि 19 ते 20 डिसेंबर या कालावधीत सागरी टप्पा अशा दोन टप्प्यांत हा सराव झाला.
• 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सागरी टप्प्यात विशेष सैन्याच्या ऑपरेशन्स, तोफा गोळीबार, दळणवळण सराव, खलाशी सराव, नेव्हिगेशन डेव्हलपमेंट आणि हेलिकॉप्टर ऑपरेशन्स यासह संयुक्त सरावांचा समावेश असेल.
SLINEX नौदल सरावात सहभागी युनिट्स :
भारताकडून : भारतीय नौदलाचे जहाज INS सुमित्रा, पूर्वेकडील नौदलाचे एक नौदल ऑफशोर पेट्रोल व्हेसेल, विशेष दलासह असेल.
श्रीलंकेकडून : SLNS Sayura, एक ऑफशोअर गस्ती जहाज, ज्यामध्ये विशेष सैन्य असेल
SLINEX नौदल सरावाचे उद्दीष्ट काय होते ?
• 2024 आवृत्तीचे उद्दिष्ट भारत आणि श्रीलंका यांच्यातील मजबूत सागरी संबंधांना अधिक बळकट करणे.
• सुरक्षित आणि नियमांवर आधारित सागरी वातावरणाला प्रोत्साहन देणे आहे.
SLINEX नौदल सरावाची सुरुवात केव्हा झाली ?
• भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्यांसाठी 2005 मध्ये SLINEX नौदल सरावाची सुरुवात करण्यात आली.
• या सरावामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत झाले आहे.