
चालू घडामोडी 19, डिसेंबर 2024 | R. Ashwin ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आर.अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
R. Ashwin announced his retirement from International Cricket
Subject : GS - खेळ, पुस्तके आणि लेखक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) रविचंद्रन अश्विनने लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव काय ?
1. प्लेइंग इट माय वे
2. द वॅाल
3. आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी
4. द टेस्ट ऑफ माय लाईफ
उत्तर : आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी
बातमी काय आहे ?
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
रविचंद्रन अश्विन बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जन्मतारिख : 17 सप्टेंबर, 1986
• जन्मस्थळ : चेन्नई, तमिळनाडू
• फलंदाजीची शैली : उजव्या हाताचा फलंदाज
• गोलंदाजीची शैली : उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
रविचंद्रन अश्विनचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण :
• आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 9 नोव्हेंबर, 2011
• आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण : भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 5 जून, 2010
• आंतरराष्ट्रीय T20 पदार्पण : भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 12 जून, 2010
रविचंद्रन अश्विनच्या आत्मचरित्रा
• अलिकडेच रविचंद्रन अश्विनने लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्या सहकार्याने आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र लिहिले आहे.
• कुट्टी स्टोरी याचा अर्थ छोटीशी गोष्ट असा होतो.
![[ A-Kutti-Cricket-Story. I-have-the-streets, r-ashwin-atmacharitra ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/R-Ashwin-A-Kutti-Cricket-Story_1734668753265.webp)
काही महत्त्वाचे क्रिकेटपटू आणि त्यांची पुस्तके पुढील प्रमाणे :
• सचिन तेंडुलकर - प्लेइंग इट माय वे
• कपिल देव - 1) क्रिकेट माय स्टाईल, 2) स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट : अॅन ऑटोबायोग्राफी
• सौरभ गांगुली - अ सेंच्युर इज नॉट इनफ
• रवी शास्त्री - स्टारगेझिंग : द प्लेयर्स इन माय लाईफ
• राहुल द्रविड - द वॅाल
• युवराज सिंग - द टेस्ट ऑफ माय लाईफ
• व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - 281 अँड बियॅाण्ड
• सुरेश रैना - बिलिव्ह : व्हॅाट लाईफ अँड क्रिकेट टॅाट मी