
चालू घडामोडी 19, डिसेंबर 2024 | भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक | India’s First Diabetes Biobank
![[ India’s First Diabetes Biobank, bhartatil pahili madhumeh jaivik bank mhanje Kay, bhartatil pahili Diabetes Biobank, madhumeh kasa hoto, Diabetes kasa hoto, insulin injections, type1 Diabetes, type2 Diabetes, Gestational Diabetes, garodarpanatil madhumeh, garodarpanatil diabetes, diabetes kami kasa karaycha, Madras Diabetes Research Foundation in Chennai, Indian Council of Medical Research, ICMR, diabetes medicine, ayurvedic medicine, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhartatil-Mahila-Madhumeh-Biobank_1734671427822.webp)
भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक
India’s First Diabetes Biobank
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात मधुमेहासाठी (डायबेटिससाठी) पहिल्या जैविक बँकेची सुरुवात कोठे करण्यात आली ?
1. मुंबई
2. चेन्नई
3. नवी दिल्ली
4. नागपूर
उत्तर : चेन्नई
• चेन्नईमध्ये देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची (डायबेटिस बायो बँक) स्थापना करण्यात आली आहे.
• ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन’ यांच्यातील सहकार्याने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.
मधुमेह जैविक बँक म्हणजे नेमकं काय ?
• २००८ ते २०२० दरम्या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन सर्वेक्षणे करण्यात आली होती. त्यावेळी गोळा केलेले मधुमेही रुग्णांचे नमुने या जैविक बँकेत ठेवण्यात आले आहेत
• या बायो बँकेचे उद्दिष्ट वैज्ञानिक संशोधनासाठी जैव नमुने गोळा करणे, प्रक्रिया करणे, साठवणे व ते वितरित करण्यासाठी एक सुविधा निर्माण करणे हे आहे.
• या बायो बँकेमध्ये Type-1, Type-2 आणि गर्भावस्थेतील मधुमेहासह तरुण व्यक्तींमधील विविध प्रकारच्या मधुमेहातील रक्ताचे नमुने भविष्यातील संशोधनासाठी जतन केलेले आहेत.
मधुमेह जैविक बँक चा संशोधनात फायदा कसा ?
• बायो बँकेमुळे मधुमेहाची कारणे, भारतीय प्रकारातील मधुमेह आणि संबंधित विकारांवरील प्रगत संशोधनदेखील शक्य होईल.
• इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमधील एका लेखात म्हटले आहे की, ही मधुमेह बायो बँक लवकर निदान होण्यासाठी, नवीन बायोमार्कर ओळखण्यात आणि वैयक्तिक उपचार धोरणे विकसित करण्यात मदत करू शकेल.
• भारत लढत असलेल्या मधुमेहविरुद्धच्या लढ्यातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
मधुमेह म्हणजे नेमकं काय ?
What is Diabetes?
• मधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा आजार हळूहळू विकसित होतो.
• यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये (ग्लूकोज) आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.
• मधुमेहाचे टाइप 1 मधुमेह अणि टाइप 2 मधुमेह असे दोन गटात वर्गीकरण करता येते.
• Type 1 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी कमी असते.
• त्यामुळे टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून इन्शुलिन घेणे अतिआवश्यक असते.
• Type-2 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही.
• इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो तुमचे स्वादुपिंड (Pancreas) बनवतो जो रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे.
• दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
• संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान न करणे यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो.
गरोदरपणातील मधुमेह(किंवा गर्भावस्थेतील मधुमेह) म्हणजे काय ?
• गरोदरपणातील मधुमेह (Gestational Diabetes ) म्हणजे गर्भधारणेदरम्यान वाढणारी उच्च रक्तातील ग्लुकोज पातळी.
• गर्भधारणेचा मधुमेह हा एक तात्पुरता आजार आहे जो सामान्यतः जन्म दिल्यानंतर अदृश्य होतो.
• तथापि, ज्या महिलांना गर्भधारणेचा मधुमेह होतो, त्यांच्या मुलांसह, त्यांना पुढील आयुष्यात Type 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.