
चालू घडामोडी 20, डिसेंबर 2024 | साहित्य अकादमी पुरस्कार 2024

साहित्य अकादमी पुरस्कार 2024
Sahitya Akademi Award 2024
Subject : GS- पुरस्कार, लेखक -पुस्तक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 चा साहित्य अकादमी पुरस्कार खालील पैकी कोणाला दिला गेला ?
1. धनंजय गुडसूरकर
2. डॉ. सुधीर रसाळ
3. श्रीकांत उम्रीकर
4. डॅा. शरण कुमार लिंबाळे
उत्तर : डॉ. सुधीर रसाळ
बातमी काय आहे ?
• ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, हिंदी कवी गगन गिल, इंग्रजी लेखक इस्टीरीन किरे यांच्यासह २१ जणांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले.
• ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यारूप’ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमध्ये देण्यात येतो ?
• 1955 पासून दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट कलाकृतींसाठी दिला जातो.
• साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांमधील साहित्यांना दिला जातो.
• भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या 22 भाषांबरोबर इंग्रजी आणि राजस्थानी या भाषांमध्ये देखील साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो.
• पुरस्काराचे स्वरूप : ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
• ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा देशातील दुसरा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे.
साहित्य अकादमी बद्दल महत्त्वाची माहिती :
• 12 मार्च 1954 रोजी भारत सरकारने साहित्य अकादमीचे औपचारिक उद्घाटन केले.
• साहित्य अकादमी जरी सरकारने स्थापन केली असली तरी अकादमी स्वायत्त संस्था (Autonomous Organisation) म्हणून काम करते.
• सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत साहित्य अकादमीची सोसायटी म्हणून नोंदणी केली आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार हे दोन प्रकारे दिले जातात :
1. साहित्य अकादमी पुरस्कार
2. साहित्य अकादमी युवा पुरस्कार : हा पुरस्कार 35 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लेखकांना दिला जातो.
उदाहरणार्थ : 2024 चा युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या " उसवण " या कादंबरीला मिळाला.