
चालू घडामोडी 20, डिसेंबर 2024 | कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प | Kaleshwaram Lift Irrigation Project

कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प
Kaleshwaram Lift Irrigation Project
Subject : GS - भूगोल- नदी, धरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचे नाव खालीलपैकी कोणते ?
1. भाक्रा नांगल प्रकल्प
2. कालेश्वरम प्रकल्प
3. हिराकुड प्रकल्प
4. नागार्जुन सागर प्रकल्प
उत्तर : कालेश्वरम प्रकल्प
बातमी काय आहे ?
नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी (NDSA) कालेश्वरम उपसा सिंचन योजनेवर लवकरच अंतिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाबाबत परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे.
• या प्रकल्पाची किंमत अंदाजे 80,000 कोटी रुपये आहे.
• हा प्रकल्प 21 जून 2019 रोजी सुरू करण्यात आला.
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?
हा प्रकल्प गोदावरी नदीवरील हा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे.
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे.
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प इतका महत्त्वाचा का आहे ?
• तेलंगण राज्याला सतत दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
• त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिंचन योजनांना प्राधान्य दिले आहे.
• गोदावरी तेलंगणमधील प्रमुख नदी आहे. ती समुद्रसपाटीपासून १00 मीटर उंचीवरून वाहते, तर तेलंगणा समुद्रसपाटीपासून 300 ते 650 मीटर उंचीवर आहे.
• त्यामुळे तेलंगणात गोदावरीसह इतर अनेक नद्या असूनही त्यांच्या पाण्याचा लाभ मिळत नव्हता.
• तेलंगणात वाहणाऱ्या गोदावरी आणि इतर नद्यांचे पाणी उचलून राज्याला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे.
• या प्रकल्पातून तेलंगणातील 13 जिल्ह्यांतील 18 लाख एकर जमिनीला सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे.
• या प्रकल्पाचा फायदा तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांना होणार आहे.
• कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांनाही सिंचन सुविधा मिळणार आहेत.