
चालू घडामोडी 21, डिसेंबर 2024 | ISA मध्ये सामील होणारा नवीन देश कोणता ? | Which is the new country joining ISA?

ISA मध्ये सामील होणारा नवीन देश कोणता ?
Which is the new country joining ISA?
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) डिसेंबर 2024 मध्ये नुकताच खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय सौरआघाडीमध्ये पूर्ण सदस्य देश म्हणून सामिल झाला ?
1. अमेरिका
2. बांग्लादेश
3. मोल्दोवा
4. श्रीलंका
उत्तर : मोल्दोवा
बातमी काय आहे ?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, मोल्दोव्हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत (International Solar Alliance) सामील झाला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA- इंटरनॅशनल सोलर अलायन्स) बद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती :
आंतरराष्ट्रीय सौर संगठन स्थापना केव्हा करण्यात आली ?
• सौरऊर्जा सोल्यूशन्सच्या उपयोजनाद्वारे हवामान बदलाविरूद्ध प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी भारत आणि फ्रान्सने संयुक्त प्रयत्न म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्सची कल्पना मांडली होती.
• आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन वरील पक्षांच्या 21 व्या परिषदेदरम्यान करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सौर संगठनाचे मुख्यालय कोठे आहे ?
इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय भारतातील गुरुग्राम (हरियाणा) येथे आहे.
आंतरराष्ट्रीय सौर संगठनाचा उद्देश काय आहे ?
• जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या आघाडीचा उद्देश आहे.
• ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याच्या सदस्य देशांमध्ये ऊर्जा संक्रमणास प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार करते.
ISA ची मिशन टुवर्ड्स 1000 स्ट्रॅटेजी काय आहे ?
• 2030 पर्यंत सौर ऊर्जा गुंतवणुकीसाठी 1,000 अब्ज अमेरिकन डॉलर जमा करणे.
• जगातील 1,000 दशलक्ष लोकांना ऊर्जा उपलब्ध करून देणे.
• 1,000 GW सौर ऊर्जा क्षमता स्थापित करणे.
मोल्दोव्हा देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मोल्दोव्हा (Moldova) हा युरोप खंडातील एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे.
• मोल्दोव्हा रोमानिया आणि युक्रेन या देशांच्या सीमेवर आहे.
• राजधानी : किशिनौ (Chişinău) ही मोल्दोव्हाची राजधानी आहे.