
चालू घडामोडी 21, डिसेंबर 2024 | महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती कोण ?

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती कोण ?
Who is the Chairman of Maharashtra Legislative Council?
Subject : GS - राज्यशास्त्र - विधानपरिषद
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपदी खालील पैकी कोणाची निवड झाली ?
1. श्री. देवेंद्र फडणवीस
2. श्री. एकनाथ शिंदे
3. श्री. राहुल नार्वेकर
4. श्री. राम शिंदे
उत्तर : श्री. राम शिंदे
बातमी काय आहे ?
महाराष्ट्राच्या विधान परिषद सभापतीपदी भाजपाच्या श्री. राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

राज्यातील विधानपरिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
• राज्यातील विधानपरिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे.
• राज्यघटनेतील कलम 169 मध्ये विधान परिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याच्या आवश्यक तरतूदी देण्यात आलेल्या आहे.
राज्यातील विधानपरिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण कशी केली जाते ?
राज्यातील विधानसभा विशेष बहुमताने ठराव पास करून संसदेकडे पाठवल्यास संसद साध्या बहुमताने विधानपरिषद निर्माण करू शकते किंवा नष्ट करू शकते.
विधानसभेचे विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय ?
• संबंधित राज्याच्या विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
• आणि हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने पारित करणे गरजेचे असते.
भारतात कोणकोणत्या राज्यांत विधानपरिषद आहे ?
• भारतात केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे.
• महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत विधानपरिषद आहे.
विधानपरिषदेची सदस्य संख्या किती असावी ?
• विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40
• व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या 1/3 इतके सभासद असू शकतात.
विधानपरिषदेत सदस्य होण्यासाठी व्यक्तिचे वय किती असावे लागते ?
विधानपरिषदेत सदस्य होण्यासाठी त्या व्यक्तिचे वय 30 वर्षे पूर्ण असावे लागते.
विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात ?
• विधान परिषदेची 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात.
• तर 1/6 सदस्य राज्यपालांकडून नामनिर्देशित (Nominated) केले जातात.
• हे 1/6 सदस्य वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले जाते.

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
• राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेलाही वरिष्ठ सभागृह असे म्हणतात.
• विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.
• विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे म्हणजे ती विसर्जित केली जात नाही.
• मात्र विधान परिषदेतील 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
विधान परिषदेचे सभापती व उपसभापती कोण निवडून देतात ?
• राज्यघटनेच्या कलम 182 अन्वये विधानपरिषद आपल्या सदस्यांमधून दोन सदस्यांना अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून निवडून देते.
• सभापती किंवा उपसभापती बनण्यासाठी घटनेत ते विधान परिषदेचे सदस्य असावे एवढीच पात्रता सांगण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या सभापतींची प्राथमिक जबाबदारी कोणती ?
• सभापती विधान परिषदेच्या बैठकांचे अध्यक्ष स्थान भूषवतात.
• विधान परिषदेच्या कामकाजाचे नियमन करून तिथे सुव्यवस्था व सभ्यता राखणे ही सभापतींची प्राथमिक जबाबदारी आहे.