
चालू घडामोडी 23, डिसेंबर 2024 | राष्ट्रीय गणित दिवस | National Mathematics Day

राष्ट्रीय गणित दिवस
National Mathematics Day
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
1. श्रीनिवास रामानुजन सर
2. चंद्रशेखर वेंकट रमण सर
3. प्रशांत चंद्र महालनोबिस सर
4. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर
उत्तर : श्रीनिवास रामानुजन सर
• श्रीनिवास रामानुजन सर : 22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवस
• चंद्रशेखर वेंकट रमण सर : 28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन
• प्रशांत चंद्र महालनोबिस सर : 29 जून - राष्ट्रीय सांख्यिकी दिवस
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : 15 ऑक्टोबर - जागतिक विद्यार्थी दिन, महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’
श्रीनिवास रामानुजन यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्रीनिवास रामानुजन हे एक महान भारतीय गणितज्ञ होते.
• पूर्ण नाव : श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
• जन्म : 22 डिसेंबर 1887 रोजी इरोड, तामिळनाडू येथे त्यांचा जन्म झाला.
• रामानुजन हे ब्रिटनच्या रॉयल सोसायटीच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होते.
• केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडलेले पहिले भारतीय होते.
• त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये योगदान दिले.
• रामानुजन यांनी सुमारे 3,900 गणिती निकाल आणि समीकरणे संकलित केले.
• त्यांच्या सर्वात मौल्यवान शोधांपैकी एक म्हणजे त्यांची π (pi) साठी अनंत मालिका.
• मृत्यू : 26 एप्रिल 1920 कुंभकोणम, तामिळनाडू, येथे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले.
रामानुजन संख्या काय आहे ?
• 1729 ही संख्या, रामानुजन संख्या म्हणून ओळखली जाते.
• 1729 ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.
राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरी करतात ?
श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिवस, 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.