
चालू घडामोडी 23, डिसेंबर 2024 | राष्ट्रीय शेतकरी दिवस | National Farmer's Day

राष्ट्रीय शेतकरी दिवस
National Farmer's Day
सर्वांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
1. श्री लाल बहादूर शास्त्री
2. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
3. श्री चौधरी चरण सिंह
4. श्री चिदंबरम सुब्रमण्यम
उत्तर : श्री चौधरी चरण सिंह
आपण राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरी करतो ?
• शेतकरी, ‘अन्नदाता’ आहे. ते भारताच्या समृद्धीचा पाया आहे. त्यांचे अथक परिश्रम देशाचे पोषण करतात.
• 23 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय शेतकरी दिन (राष्ट्रीय किसान दिवस) त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे.
• राष्ट्रीय शेतकरी दिनाचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांचे सामाजिक-आर्थिक विकासातील योगदान ओळखणे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.
भारतरत्न श्री चौधरी चरण सिंह यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म :
• भारतरत्न श्री चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात झाला.
• शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्री चौधरी चरण सिंह यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत सक्रिय राहिले.
मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान :
• श्री चौधरी चरण सिंह हे 1967 मध्ये पहिल्यांदा तर 1970 मध्ये दुसऱ्यांदा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
• श्री चौधरी चरण सिंग यांनी 1979 ते 1980 पर्यंत भारताचे 5 वे पंतप्रधान म्हणून काम केले.
• त्यांचा कार्यकाळ कमी असतानाही त्यांनी कृषी क्षेत्रात स्थिरता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या.
पहिल्यांदा राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
2001 मध्ये, भारत सरकारने माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित केला आणि 23 डिसेंबर 2001 हा दिवस पहिल्यांदा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरी करण्यात आला.
मृत्यू :
• 29 मे 1987 रोजी श्री चौधरी चरणसिंग यांचे निधन झाले.
• शेतकरी समुदायांशी त्यांचा आजीवन संबंध असल्यामुळे नवी दिल्लीतील त्यांच्या स्मारकाला किसान घाट असे नाव देण्यात आले.
श्री चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला ?
2024 मध्ये मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.