
चालू घडामोडी 23, डिसेंबर 2024 | डिंगा-डिंगा आजार काय आहे ? | What is Dinga-Dinga disease ?

डिंगा-डिंगा आजार काय आहे ?
What is Dinga-Dinga Disease ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे खालील पैकी कोणत्या देशात डिंगा-डिंगा विषाणू पसरला आहे ?
1. काँगो
2. ब्राझील
3. चीन
4. युगांडा
उत्तर : युगांडा (Uganda)
डिंगा डिंगा आजाराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अलीकडे आफ्रिकन देश युगांडामध्ये डिंगा डिंगा विषाणूचा प्रसार झाला आहे.
• युंगाडामधील (Uganda) जवळपास 300 जणांना या रहस्यमयी आजाराची लागण झाली आहे.
• यामध्ये बहुतांश महिला व मुली आहेत.
• युगांडातील बुंदीबाग्यो जिल्ह्यात त्याचा सर्वात मोठा परिणाम दिसून आला आहे.
• या आजार होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत डॉक्टरांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या रोगाचे नाव डिंगा-डिंगा कसे पडले ?
• या आजारात माणसं चालता-चालता अचानक नाचू लागतात. त्यांचं शरीर त्यांच्या नियंत्रणात राहत नाही.
• युगांडामध्ये पसरलेल्या या आजाराला अद्याप शास्त्रीय नाव दिलेले नाही.
• तेथील लोक या आजाराला स्थानिक भाषेत ‘डिंगा-डिंगा’ असे म्हणतात.
• डिंगा-डिंगा याचा अर्थ 'नृत्यासारखे जोरदार थरथरणे'
डिंगा डिंगा आजाराची लक्षणं कोणती ?
ताप येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अर्धांगवायु झाल्याप्रमाणे शरिराची अवस्था होणे, ही या आजारीची लक्षण असल्याचे बोलले जाते.
या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना चालणे जवळजवळ अशक्य होते.
डिंगा डिंगा आजारावर उपचार काय ?
• डिंगा डिंगा आजारावर सध्या कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार नाही, की त्याला प्रतिबंध करणारी लसही नाही.
• रिपोर्ट्सनुसार, सध्या व्हायरसच्या उपचारांसाठी आरोग्य पथकांद्वारे केवळ अँटीबायोटिक्सचा वापर केला जात आहे. या औषधांच्या मदतीने, लोक एका आठवड्यात बरे होतांना दिसत आहेत.