
चालू घडामोडी 26, डिसेंबर 2024 | वीर बाल दिवस

वीर बाल दिवस
Veer Baal Diwas
Subject : GS- दिनविशेष, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) देशात वीर बाल दिवस केव्हा पाळला जातो ?
1. 26 जानेवारी
2. 15 ॲागस्ट
3. 14 नोव्हेंबर
4. 26 डिसेंबर
उत्तर : 26 डिसेंबर
वीर बाल दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताच्या भविष्याचे आधारस्तंभ म्हणून बालकांचा गौरव करण्यासाठी देशात वीर बाल दिवस पाळला जातो.
• परिस्थिती कितीही कठीण आली तरी राष्ट्र आणि राष्ट्रहितापेक्षा काहीही मोठे नसते, याची शिकवण वीर बाल दिवस आपल्याला देतो.
2024 चा वीर बाल दिवस कोठे आयोजित करण्यात आला ?
• 26 डिसेंबर 2024 रोजी महिला आणि बाल मंत्रालयाद्वारे भारत मंडपम, नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस आयोजित करण्यात आला.
• शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा सन्मान करण्यात आला.
वीर बाल दिवस का आणि केव्हा पाळला जातो ?
• शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग जी यांच्या पुत्रांच्या, वीर जोरावर सिंग जी आणि वीर फतेह सिंग जी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी वीर बाल दिवस पाळला जातो.
• या दोन साहिबजादांनी मुघल शासक औरंगजेबाच्या अत्याचारांना तोंड देताना धर्मासाठी बलिदान दिले होते.
• वीर जोरावर सिंग जी आणि वीर फतेह सिंग जी यांना 26 डिसेंबर 1705 रोजी जिवंत भिॅतीत गाडले.
• त्यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो.
पहिला वीर बाल दिवस केव्हा पाळण्यात आला ?
• गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 2022 मध्ये भारत सरकारने दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जाईल अशी घोषणा केली होती.
• पहिला वीर बाल दिवस 26 डिसेंबर 2022 रोजी पाळण्यात आला.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार काय आहे ?
• पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारत सरकारकडून मुलांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.
• मुलांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घ्यावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
• पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार भारत सरकारकडून उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो.
• कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण या 7 श्रेणींमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो.