
चालू घडामोडी 25, डिसेंबर 2024 | पंडित मदन मोहन मालवीय | Pandit Madan Mohan Malaviya Birth Anniversary

पंडित मदन मोहन मालवीय
Pandit Madan Mohan Malaviya Birth Anniversary
पंडित मदन मोहन मालवीय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐💐
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1932 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झाला. काँग्रेसच्या वतीने या करारावर खालील पैकी कोणी सही केली ?
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. सरदार वल्लभभाई पटेल
3. डॉ राजेंद्र प्रसाद
4. पंडित मदन मोहन मालवीय
उत्तर : पंडित मदन मोहन मालवीय
• पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला.
• भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील योगदान आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
• पंडित मदन मोहन मालवीय यांनी सविनय कायदेभंग आणि असहकार आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
• पंडित मदन मोहन मालवीय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4 वेळा अध्यक्ष होते.
• 1909, 1918, 1932 आणि 1933 (अध्यक्षपदी निवडून आलेल्या मदन मोहन मालवीय यांना अटक केल्यानंतर 1933 मध्ये सेनगुप्ता यांची काँग्रेस प्रमुख म्हणून निवड झाली.)
• 'सत्यमेव जयते ': भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना पंडित मालवीय यांनी 1918 च्या अधिवेशनात 'सत्यमेव जयते' ही सर्वात प्रसिद्ध घोषणा दिली होती.
पुणे करार काय होता ?
पुणे करारावर कोणी सही केली ?
• ब्रिटीश सरकारच्या जातीय निवाडा द्वारे (Communal Award) दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती.
• परंतु महात्मा गांधींनी हिंदू समाजात फूट पडेल या भीतीने याला विरोध केला आणि प्राणांतिक उपोषण सुरू केले.
• तीव्र वाटाघाटीनंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात करार झाला ज्याला पुणे करार म्हणून ओळखले जाते.
• या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदार संघ देण्यात आला.
• 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
पंडित मदन मोहन मालवीय यांना ‘महामना’ ही पदवी कोणी दिली ?
• पंडित मदन मोहन मालवीय यांना महात्मा गांधींनी 'महामना' ही पदवी दिली होती.
• भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी त्यांना 'कर्मयोगी' ही पदवी दिली होती.
संस्था :
• हिंदू महासभा : मालवीय हे हिंदू महासभेच्या सुरुवातीच्या नेत्यांपैकी एक होते, आणि त्यांनी 1915 मध्ये हिंदू महासभेच्या स्थापनेसाठी मदत केली.
• बनारस हिंदू विद्यापीठ : 1916 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली.
• 1919 ते 1938 पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले.
• स्काउट आणि गाईड : पंडित मदन मोहन मालवीय भारतातील स्काउट आणि गाईडच्या संस्थापकांपैकी एक होते.
मृत्यू :
12 नोव्हेंबर 1946 रोजी त्यांचे निधन झाले.
पुरस्कार आणि सन्मान :
• 2014 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंडित मदन मोहन मालवीय यांनागौरविण्यात आले.
• 2016 मध्ये, भारतीय रेल्वेने त्यांच्या सन्मानार्थ वाराणसी-नवी दिल्ली महामना एक्सप्रेस सुरू केली.