
चालू घडामोडी 25, डिसेंबर 2024 | पंतप्रधानांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान

पंतप्रधानांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान
Kuwait's highest honor to the PM Narendra Modi
Subject : GS - पुरस्कार, भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ प्रदान करण्यात आला आहे.
2. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
3. दोन्ही पर्याय बरोबर
4. दोन्ही पर्याय चूक
उत्तर : दोन्ही पर्याय बरोबर
बातमी काय आहे ?
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले
पुरस्कार आणि कुवेत देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ प्रदान करण्यात आला आहे.
• कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांनी त्यांना हा सन्मान दिला.
• हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
• भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एखाद्या देशाकडून मिळालेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
कुवेत (Kuwait) देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• कुवैत हा अरबी द्वीपकल्पातील एक देश आहे
• इराक आणि सौदी अरेबियाच्या सीमेवर आहे.
• कुवैत देशाची पूर्वेकडील सीमा पर्शियन आखातास (Persian Gulf) लागून आहे.
• राजधानी : कुवेत सिटी
• चलन : कुवैती दिनार
