
चालू घडामोडी 24, डिसेंबर 2024 | महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप

महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप
Maharashtra Cabinet Portfolio Allocation
Subject : GS - राज्यशास्त्र - महाराष्ट्र विधानमंडळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र राज्याचे वर्तमान कृषी मंत्री कोण आहेत ?
1. श्री एकनाथ शिंदे
2. श्री अजितदादा पवार
3. श्री दादाजी भुसे
4. श्री माणिकराव कोकाटे
उत्तर : श्री माणिकराव कोकाटे
या टॉपिक वरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात जसे की,
• 2024 या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोणी मांडला ?
• महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे ?
• महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहे ?
• महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री कोण आहे ?
• महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बालकल्याणमंत्री कोण आहे ?
• महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहे ?
खाली दिलेल्या मंत्री आणि मंत्रालयाची योग्य जोडी कोणती ?
1. गृह मंत्री - श्री देवेंद्र फडवणीस
2. अर्थमंत्री - श्री अजित पवार
3. पर्यावरण मंत्री - श्रीमती पंकजा मुंडे
4. वरील सर्व पर्याय योग्य आहेत
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य आहेत
नोट :
• एवढे सगळे मंत्री पाठ करायची गरज नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात, ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे तेथील मंत्री नक्की पाठ करा.
• त्यानंतर तुम्ही ज्या परीक्षेसाठी फॉर्म भरलाय उदाहरणार्थ वनसेवक, वनरक्षक परीक्षेसाठी पर्यावरण मंत्री, कृषी मंत्री पाठ ठेवा.
• महत्वाची मंत्रालये जसे की अर्थमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री, महिला व बालविकास मंत्री पाठ असू द्या.
