
चालू घडामोडी 24, डिसेंबर 2024 | साने गुरुजी | Sane Guruji

साने गुरुजी
Sane Guruji
स्वातंत्र्यसेनानी, लेखक, शिक्षक आणि समाजसुधारक साने गुरूजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐💐
Subject : GS - इतिहास - महाराष्ट्रातील समाजसुधारक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पुढील नियतकालिके खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? (MPSC Combine 'B' 2018)
A) विद्यार्थी
B) काँग्रेस
C) साधना
पर्याय :
1. आचार्य अत्रे
2. रामानंद तीर्थ
3. हिरवे गुरुजी
4. साने गुरुजी
उत्तर : साने गुरुजी
साने गुरुजी यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• साने गुरुजी हे स्वातंत्र्यसेनानी, लेखक, शिक्षक आणि समाजसुधारक होते.
• साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला.
• त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. लोक त्यांना प्रेमाने साने गुरूजी म्हणत.
• त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
• इ.स. 1930 साली साने गुरुजींनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
• त्यामुळे त्यांना धुळे, नाशिक व तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगावा लागला.
• जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (1936) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले.
• ग्रामीण भागात स्वातंत्र्याचे विचार पसरवण्यासाठी त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक सुरू केले.
• 1940 साली चांदवड येथे युवक काँग्रेस परिषद भरवल्यामुळे साने गुरुजींना अटक करण्यात आली.
• 1942 मध्ये भारत छोडो आंदोलना भाग घेतल्यामुळे त्यांना १५ महिने तुरूंगात टाकले.
समाज कार्य :
• दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून साने गुरुजींनी प्रयत्न केले.
• समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.
• 1946 साली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केले.
• मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी साने गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली.
प्रमुख साहित्य :
• साधना (हे साप्ताहिक)
• काँग्रेस (नावाचे साप्ताहिक)
• विद्यार्थी (नावाचे मासिक)
• कर्तव्य (नावाचे दैनिक)
• श्यामची आई, धडपडणारी मुले, क्रांती, रामाचा शेला इत्यादी.
• पत्री हा साने गुरुजींचा पहिला काव्यसंग्रह होता.
प्रमुख गीत/ प्रार्थना :
• बलसागर भारत होवो
• खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
" श्यामची आई " हे त्यांचे आत्मकथन परक पुस्तक. यावरून आचार्य यात्रे यांनी " श्यामची आई " हा चित्रपट काढला या चित्रपटाला स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला