
चालू घडामोडी 27, डिसेंबर 2024 | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
Former prime minister Manmohan Singh
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
• अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर, रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी, नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
• भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
Subject : GS - भारताचे पंतप्रधान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
अ) ते भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.
ब) त्यांनी 10 वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे.
4. अ आणि ब दोन्ही चूक आहे
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर आहे.
जन्म आणि शिक्षण :
• 26 सप्टेंबर 1932 रोजी आजच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात त्यांचा जन्म झाला.
• 1947 च्या फाळणीनंतर डॉ. मनमोहन सिंग कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले.
• घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
• स्कॉलरशिप मिळवून डॉ. मनमोहन सिंग यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं.
देशाच्या आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास :
• 1971 मध्ये डॉ. मनमोहन सिंग हे भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले.
• 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त
• 1976 अर्थ मंत्रालयाचे सचिव
• 1982 ते 1985 भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर
• 1985 ते 87 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
• 1991 मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री
• 1991 पासून राज्यसभेचे सदस्य
• 1998 ते 2004 दरम्यान राज्यसभेत विरोधी पक्षनेते
• 2004 ते 2009 पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान
• 2009 ते 2014 दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.
भारताची अर्थव्यवस्था बदलणारे अर्थसरदार डॉ. मनमोहन सिंग
• 1990-91 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली होती.
• इराकनं कुवेतवर केलेल्या हल्ल्यामुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तेलाचे दरही गगनाला भिडले होते.
• भारताने अल्पमुदतीची कर्जं भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवर ताण आला होता.
• आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ञांची नेमणूक करण्याची गरज असल्याचं तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या लक्षात आलं.
• अशा वेळी नाव समोर आलं ते अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच.
• पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायचे होते.
• डॉ.मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला.
• त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर गेली.
• मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली.
पुरस्कार आणि सन्मान :
डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक देश विदेशातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 1987 मध्ये भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 1993 वित्तमंत्री म्हणून यूरो मनी पुरस्कार
• 1993 आणि 1994 वित्तमंत्री म्हणून आशिया मनी पुरस्कार
• जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान
• केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार