
चालू घडामोडी 27, डिसेंबर 2024 | डॉ. पंजाबराव देशमुख | Dr. Panjabrao Deshmukh
डॉ. पंजाबराव देशमुख
Dr. Panjabrao Deshmukh
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, कृषी
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक खालील पैकी कोणास म्हणतात ?
1. डॉ राजेंद्र प्रसाद
2. पंडित जवाहरलाल नेहरू
3. डॉ. पंजाबराव देशमुख
4. सरदार वल्लभभाई पटेल
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख
जन्म आणि शिक्षण :
• डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला.
• प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या 'फर्ग्युसन कॉलेज' इथून पूर्ण केलं.
• 1921 मध्ये इंग्लंडच्या केंब्रीज विद्यापीठातून 'बॅरिस्टर पदवी' उत्तीर्ण केली.
• येथेच त्यांनी संस्कृतमध्ये MA. आणि PHD ची पदवी घेतली.
राजकीय योगदान :
• भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
• 1930 मध्ये ते प्रांतीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले.
• स्वातंत्र्यापूर्वी ते प्रांतीय कायदेमंडळात शिक्षण मंत्री, कृषी व सहकार विभागाचे मंत्री बनले होते.
• स्वातंत्र्यानंतर 1952, 1957 व 1962 या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले.
• ते 1952 ते 1962 पर्यंत दहा वर्षे भारताचे कृषी मंत्री होते.
शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदान :
• महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करुन कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं.
• शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी "भारत कृषक समाज” स्थापन केले.
• त्याचबरोबर ‘ राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची ’ स्थापना केली.
• शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
• त्यांनी 1960 मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले होते.
• जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली.
• त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे.
• त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले.
मृत्यू :
• 10 एप्रिल 1965 रोजी दिल्ली येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच निधन झालं.
• त्यांच्या स्मरणार्थ अकोला इथं डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आलं.
हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
1933 मध्ये शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारित करण्यात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक देखील म्हणतात.