
चालू घडामोडी 27, डिसेंबर 2024 | स्वामित्व योजना म्हणजे काय ? | Svamitva Scheme

स्वामित्व योजना म्हणजे काय ?
Svamitva Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली स्वामित्व योजना खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
2. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी
3. बचत गटांना कर्ज मिळविण्यासाठी
4. शेतकऱ्यांच्या जमिन मालकी प्रमाणपत्रासाठी
उत्तर : शेतकऱ्यांच्या जमिन मालकी प्रमाणपत्रासाठी
बातमी काय आहे ?
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2024 रोजी 58 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण करतील.
• स्वामीत्व योजनेंतर्गत 2 कोटींहून अधिक प्रॉपर्टी कार्डची निर्मिती आणि वितरण आणि एकाच दिवसात 58 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण ही या कार्यक्रमात मोठी उपलब्धी आहे.
स्वामित्व योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त, 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजना सुरू केली होती.
• ही योजना पंचायत राज मंत्रालया मार्फत सुरू केली आहे.
• पंचायत राज मंत्रालय, राज्य पंचायती राज विभाग, राज्य महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण यांच्यातील सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे.
स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट कोणते ?
योजनेचे उद्दिष्ट ड्रोन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना त्यांच्या "मालकीहक्कांच्या नोंदी" प्रदान करणे हे आहे.
स्वामित्व योजना म्हणजे काय ?
• स्वामित्व योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल.
• उपलब्ध पुराव्यानुसार संबंधित मालकाला किंवा शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) दिले जाईल.
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय ?
• सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमिनींचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे केले जाईल.
• सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल.
• जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील.
• त्या ओळखपत्राला ' संपत्ती कार्ड ', किंवा " प्रॉपर्टी कार्ड " म्हणून ओळखले जाते.
स्वामित्व योजनेचे फायदे कोणते ?
• मालकी हक्क असणाऱ्या जमिनीच्या मालकाच्या नावे अचूक जमिनीची नोंद होण्यास तत्परता येईल.
• ग्रामीण भागातील जामिनीमुळे होणारे वाद विवाद कमी होतील.
• सरकारला शेतीविषयक नव-नवीन योजना तयार करण्यास आणि योजना राबवण्यास सोयीस्कर होईल.
• ग्रामपंचायत स्तरावर जमिनीची कर आकारणी सोपी होईल.
• या योजनेचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होईल ज्यांची मालमत्ता आहे परंतु काही कारणास्तव त्यांची कागदपत्रे नाहीत. अशा परिस्थितीत ते प्रमाणपत्र ("प्रॉपर्टी कार्ड ") मिळवून जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास सक्षम असतील.
• योजनेद्वारे मिळविलेले मालकी प्रमाणपत्र (" प्रॉपर्टी कार्ड ") असल्याने बँकाकडून कर्ज घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल.