
चालू घडामोडी 28, डिसेंबर 2024 | कोठे आहे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय ? | Country's first digital museum

कोठे आहे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय ?
Country's first digital museum
बातमी काय आहे ?
भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले आहे.
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जैसलमेरच्या दगडांपासून बनवलेले भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय "अभय प्रभावना" हे खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. राजस्थान
3. गुजरात
4. उत्तर प्रदेश
उत्तर : महाराष्ट्र
"अभय प्रभावना" हे संग्रहालय कोठे आहे ?
• जैसलमेरच्या दगडांपासून बनवलेले भारतातील पहिले डिजिटल म्युझियम "अभय प्रभावना" महाराष्ट्रात आहे.
• हे संग्रहालय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर परवडी या गावांत उभारण्यात आले आहे.
"अभय प्रभावना" हे संग्रहालय कोणी बांधले ?
अमर प्रेरणा ट्रस्टच्या माध्यमातून या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे.
फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चर अँड हिस्ट्री ( Firodia Institute of Philosophy Culture and History) यांनी "अभय प्रभावना" हे संग्रहालय बांधले आहे.
"अभय प्रभावना" संग्रहालयाचे वैशिष्ट्य कोणती ?
• 2200 वर्ष जुन्या पाले जैन लेण्यांजवळ 50 एकरात या संग्रहालय बांधले आहे.
• जवळजवळ 12 वर्षांत हे संग्रहालय बांधण्यात आले असून यासाठी सुमारे 400 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.
• जैसलमेरच्या विशेष पिवळ्या दगडांपासून याची निर्मिती करण्यात आली आहे.
• संग्रहालयात 100 फुटांचा एक मानस्तंभ आहे.
• हे संग्रहालय हायटेक ऑडिओ विजुअल्स, ॲनिमेशन, वर्चुअल रियालिटी अनुभव आणि परस्पर संवाद प्रणालीने समृद्ध आहे.
• या संग्रहालयात 30 विशेष डिझाईन केलेल्या गॅलरी आहेत.
"अभय प्रभावना" संग्रहालय बांधण्याचा उद्देश कोणता ?
• जैन तत्वज्ञान आणि भारतीय वारसा यांना समर्पित हे संग्रहालय आहे.
• सर्वसामान्यांना जैन विचार, श्रद्धा आणि इतिहास सहज उपलब्ध करून देणे.
• जैन धर्माचा वारसा, सौंदर्य आणि शैक्षणिक मूल्य दाखवून पर्यटकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे.
• जैन विचारांची समकालीन प्रासंगिकता आणि दैनंदिन उपयोगिता यावर प्रकाश टाकणे.
• मानवतावाद, कायदा आणि राजकारण, व्यापार आणि वाणिज्य इत्यादी विविध क्षेत्रातील योगदान प्रदर्शित करण्यासाठी.
• डिजिटल रेकॉर्ड प्रदर्शित करून गौरवशाली जैन इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणे आणि भविष्यात संशोधनासाठी आधार तयार करणे.