
चालू घडामोडी 31, डिसेंबर 2024 | अंदमान आणि निकोबार बेटे

अंदमान आणि निकोबार बेटे
Andaman and Nicobar Islands
Subject : GS - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणी अंदमान आणि निकोबार बेटांना , शहीद आणि स्वराज्य बेट असे नाव दिले ?
1. महात्मा गांधी
2. नेताजी सुभाषचंद्र बोस
3. सरदार वल्लभभाई पटेल
4. पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस
बातमी काय आहे ?
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये 30 डिसेंबर दिवशी पोर्टब्लेअरमध्ये तिरंगा फडकवत इंग्रजांच्या राजवटीतून अंदमान निकोबारला मुक्त केलं होतं.
• ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालेला हा पहिलाच प्रदेश होता.
• त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक ऐतिहासिक दिवस आहे.
दुसऱ्या महायुद्धात अंदमान आणि निकोबार बेटांवर कब्जा कोणी केला ?
• दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी शाही सेनेनं 23 मार्च 1943 ला अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर कब्जा केला.
• त्यांनतर अंदमान निकोबार द्वीपसमूह आझाद हिंद सेनेच्या अंतरिम सरकारकडे सोपवण्याची घोषणा जपानच्या पंतप्रधानांनी, 6 नोव्हेंबर 1943 ला टोक्योमध्ये ग्रेटर इस्ट एशियाटीक नेशन्सच्चया सभेत केली.
• त्यांनतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 29 ते 31 डिसेंबर 1943 दरम्यान अंदमान द्वीपसमूहाचा दौरा करत पहिल्यांदा भारताच्या धर्तीवर तिरंगा फडकवला.
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना ब्रिटिश राजवटीपासून मुक्त केलेले प्रदेश म्हणून घोषित केले.
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाला शहीद आणि निकोबार बेटाला स्वराज्य असे नाव दिले होते.
अंदमान आणि निकोबार बेटे
• अंदमान आणि निकोबार बेटे भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे.
• अंदमान आणि निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात भारतीय मुख्य भूमीच्या आग्नेयेला आहेत.
• यात अंदमान बेटे आणि निकोबार बेटे या दोन बेट समूहांचा समावेश आहे.
• 10 डिग्री चॅनेल (Ten Degree Channel) ही एक अरुंद सामुद्रधुनी आहे जी अंदमान बेटांना निकोबार बेटांपासून वेगळी करते.
• हे अंदाजे 10-डिग्री अक्षांशवृत्तावर आहे.
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
(Army ARO Jodhpur 2021)
पोर्ट ब्लेअर (Port Blair) शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे.
भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाचे नाव काय आहे ?
(SSC GD 2022)
इंदिरा पॉइंट हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाचे नाव आहे.
भारतातील जागृत ज्वालामुखी चे नाव काय ?
(SSC GD 2021)
बॅरेन आयलँड (Barren Island) हा भारतातील अंदमान आणि निकोबारमध्ये आढळणारा एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे