
चालू घडामोडी 30, डिसेंबर 2024 | भारतातील पहिला बायो-बिटुमेन राष्ट्रीय महामार्ग | India's first bio-bitumen national highway

भारतातील पहिला बायो-बिटुमेन राष्ट्रीय महामार्ग
India's First Bio-Bitumen National Highway
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, भारतातील पहिल्या बायो-बिटुमेन (जैविक डांबर) राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन खालील पैकी कोणत्या राज्यात झाले ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. उत्तर प्रदेश
4. हरियाणा
उत्तर : महाराष्ट्र
बायो-बिटुमेन (जैविक डांबर) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात बायो-बिटुमेन (जैविक डांबर) पासून बनलेल्या देशातील पहिल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
• नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH- 44) मनसर बायपास येथे 'बायो बिटुमिन' तंत्रज्ञानाच्या मदतीने हा रस्ता तयार करण्यात आला आहे.
• हा रस्ता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CRRI), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि प्राज इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
यासाठी लागणारे तंत्रज्ञान कोणी विकसित केले ?
• हे तंत्रज्ञान प्राज इंडस्ट्रीज च्या माध्यमातून विकसित करण्यात आले असून यामध्ये कच्च्या लीग्नीनचे बायो बिटूमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
• लीग्नीन हा एक प्रकारचा जटिल पॉलिमर (फायबर) असून तो वनस्पतींमध्ये आढळतो.
बायो-बिटुमेन म्हणजे काय ?
• बायो-बिटुमेन याला जैविक डांबर असेही म्हणतात.
• बायो-बिटुमेन हे जैव-आधारित बाइंडर आहे, जे भाजीपाला, झाडाचे खोड, शेवाळ, लिग्निन (लाकडाचा एक घटक) यांसारख्या अक्षय स्रोतांपासून बनविण्यात येते.
बायो-बिटुमेनचे फायदे काय ?
• पेट्रोलियम बिटुमेनला (डांबराला) स्थानिक पर्याय म्हणून बायो-बिटुमेन विकसित करण्यात आले आहे.
• याचा वापर रस्ते बांधण्यासाठी केल्यास प्रदूषण कमी होणार आहे.
• हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल.
• पारंपारिक डांबरी रस्त्यापेक्षा बायो-बिटुमेन रस्ता 40% अधिक टिकाऊ आहे.
• भारत सध्या एकूण पुरवठ्यापैकी 50% डांबर आयात करतो यासाठी होणारा आयात खर्च कमी होईल.