
चालू घडामोडी 30, डिसेंबर 2024 | भारतीय लष्कराने कोठे उभारला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

भारतीय लष्कराने कोठे उभारला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, भारतीय लष्कराने भारत-चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. हा पुतळा खालील पैकी कोणत्या सरोवराच्या काठावर आहे ?
1. मानस सरोवर
2. वुलर सरोवर
3. पँगाँग सरोवर
4. दाल सरोवर
उत्तर : पँगाँग सरोवर (Pangong Lake)
बातमी काय आहे ?
• भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
• छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होताना लडाखची ती युद्धभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमली. यावेळी जवानांनी प्रचंड उत्साहात पोवाडे आणि शौर्य गीते सादर केली.
पुतळा कोठे उभारण्यात आला ?
• हा पुतळा पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC - Line of Actual Control) जवळ उभारण्यात आला.
• हा पुतळा पँगाँग सरोवराच्या किनार्यावर 14,300 फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.
पँगाँग सरोवरा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर :
• अक्साई चिनच्या विवादित प्रदेशात जवळजवळ 4,350 मीटर उंचीवर असलेले पँगॉन्ग तलाव हे जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
• लेह-लडाखमधील सर्वात प्रसिद्ध तलावांपैकी एक आहे.
• पँगॉन्ग हे नाव तिबेटी शब्द "पँगॉन्ग त्सो" वरून आले आहे, ज्याचा अर्थ "उंच गवताळ तलाव" असा आहे.
• पँगॉन्ग तलावाची लांबी 134 किमी असून 1/3 भाग भारतात तर 2/3 भाग चीनमध्ये (तिबेट स्वायत्त प्रदेश) पसरलेला आहे.