
चालू घडामोडी 01, जानेवारी 2025 | राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष कोण ?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष कोण ?
New Chairperson of National Human Rights Commission
Subject : GS -नियुक्ती, राज्यशास्त्र, वैधानिक संस्था
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, खालील पैकी कोणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला ?
1. श्री गिरीशचंद्र मुर्मू
2. श्री के. संजय मूर्ती
3. श्री धनंजय चंद्रचूड
4. श्री व्ही. रामसुब्रमण्यम
उत्तर : श्री व्ही. रामसुब्रमण्यम
बातमी काय आहे ?
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम (V. Ramasubramanian) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

"राष्ट्रीय मानवाधिकार आयोग" बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर प्रश्न-उत्तरे :
(National Human Rights Commission)
"राष्ट्रीय मानवाधिकार आयोग" ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
(SSC GD)
• 12 ऑक्टोबर 1993 रोजी "राष्ट्रीय मानवाधिकार आयोग" ची स्थापना झाली.
• मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 द्वारे या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे उद्दिष्ट कोणते ?
"राष्ट्रीय मानवाधिकार आयोग" काय काम करते ?
• मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे या आयोगाचे उद्दिष्ट आहे.
• भारताच्या राज्यघटनेद्वारे हमी दिलेले आणि आंतरराष्ट्रीय करारांमध्ये अंतर्भूत असलेल्या व्यक्तींचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकारांचे रक्षण करण्याचे काम या संस्थेकडे आहे.
• हे देशातील मानवाधिकारांचे वॉचडॉग म्हणून काम करते .
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले जाते ?
भारताचे निवृत्त सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवडले जाते.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे .
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात किती सदस्य असतात ?
( महाराष्ट्र वनरक्षक 2023)
• आयोग ही एक बहु-सदस्यीय संस्था आहे.
• एक अध्यक्ष, आणि 5 इतर सदस्य असे पूर्णवेळ सदस्यांचा समावेश आहे.
• या पूर्णवेळ सदस्यांव्यतिरिक्त, आयोगामध्ये 7 पदसिद्ध सदस्य देखील आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतात ?
• राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
• ही नियुक्ती राष्ट्रपती 6 सदस्यीय समितीच्या शिफारशींनुसार करतात.
शिफारश समितीमध्ये कोण कोण असतं ?
1. पंतप्रधान (शिफारश समितीचे अध्यक्ष)
2. लोकसभेचे अध्यक्ष
3. राज्यसभेचे उपसभापती
4. लोकसभेतील विरोधी पक्षनेते
5. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते