
चालू घडामोडी 01, जानेवारी 2025 | One Nation One Subscription | एक राष्ट्र - एक सदस्यत्व योजना

एक राष्ट्र - एक सदस्यत्व योजना
One Nation One Subscription
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली ‘एक राष्ट्र - एक सदस्यत्व’ (One Nation One Subscription) योजना खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि नियतकालिके उपलब्ध करून देण्यासाठी
2. शेअर बाजारातील त्रुटी दूर करण्यासाठी
3. लघू उद्योगांसाठी विशेष सवलतीसाठी
4. बचत गटांना कर्ज देण्यासाठी
उत्तर : आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि नियतकालिके उपलब्ध करून देण्यासाठी
बातमी काय आहे ?
• एक राष्ट्र - एक सदस्यत्व’ योजनेचा पहिला टप्पा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
• केंद्रीय मंत्रिमंडळाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) म्हणजेच ‘एक राष्ट्र - एक सदस्यत्व’ योजनेला मंजुरी दिली.
एक राष्ट्र - एक सदस्यत्व (One Nation One Subscription) योजना काय आहे ?
• हा उपक्रम संपूर्ण देशातील सरकारी उच्च शिक्षण संस्थां मधील तसेच केंद्र सरकारची संशोधन आणि विकास केंद्रे यातील देशातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि शास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची नावाजलेली नियतकालिके (जर्नल) आणि लेख (Rresearch Articles and Journals ) उपलब्ध करून देऊन ज्ञानामधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतो.
• यामध्ये देशभरातील 6,300 हून अधिक सरकारी-व्यवस्थापित उच्च शिक्षण संस्था तसेच केंद्र सरकार-व्यवस्थापित संशोधन आणि विकास संस्थांचा समावेश आहे.
• ही सर्व जर्नल फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, त्यामुळे हे सर्व वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचे आणि सोपे होईल.
एक राष्ट्र - एक सदस्यत्व ( One Nation One Subscription ) योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
• सर्व पात्र विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि नियतकालिके (जर्नल) उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
• एक राष्ट्र - एक सदस्यत्व’ योजना 2047 पर्यंत स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेची आधारशिला आहे.
एक राष्ट्र - एक सदस्यत्व ( One Nation One Subscription ) योजनेसाठी किती निधी देण्यात आला ?
• या उपक्रमासाठी 2025, 2026, आणि 2027 या तीन वर्षांसाठी एकूण 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• या निधीतून सहभागी संस्थांच्या सदस्यता शुल्काचा खर्च केला जाईल.
एक राष्ट्र - एक सदस्यत्व ( One Nation One Subscription ) योजनेचा फायदा काय होईल ?
• विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांच्या संशोधन क्षमता वाढविण्यासाठी ज्ञानाच्या उपलब्धतेसाठी आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि नियतकालिके (research articles and journals ) उपलब्ध करून देते.
• शहरी भागात तसेच दुर्गम भागात जागतिक दर्जाची संशोधन संसाधने उपलब्ध होतील.
• भारताला संशोधन आणि विकासामध्ये जागतिक प्रमुख म्हणून उदयास येण्यासाठी मदत होईल.