
चालू घडामोडी 01, जानेवारी 2025 | कोठे आहे देशातील पहिला काचेचा पुल ? | India's First Glass Bridge

कोठे आहे देशातील पहिला काचेचा पुल ?
India's First Glass Bridge
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) देशातील पहिला सागरी काचेचा पुल कोणत्या राज्यात बांधण्यात आला ?
1. महाराष्ट्र
2. तमिळनाडू
3. आंध्र प्रदेश
4. कर्नाटक
उत्तर : तमिळनाडू
बातमी काय आहे ?
• तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
• तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (MK Stalin) यांनी या काचेच्या पुलाचे उद्घाटन केले.
देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुला बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेला हा काचेचा पूल देशातील अशा प्रकारचा पहिला पूल आहे.
• हा पूल विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर यांचा 133 फूट उंच पुतळा या दोन प्रसिद्ध स्मारकांना जोडतो.
• हा काचेचा पूल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आहे.
• हा काचेचा पूल तामिळनाडू सरकारने 37 कोटी रुपये खर्चून बांधला आहे.
• हा पूल पर्यटकांना विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर पुतळा आणि आसपासच्या समुद्राचे उत्कृष्ट दृश्य देतो.
• या पुलावरून चालणे हा एक रोमांचक अनुभव असल्याचे एका पर्यटक अधिकाऱ्याने सांगितले आहे.
• पर्यटकांना आधुनिक सुविधा देऊन पर्यटनाला चालना देणे हा या पुलाचा उद्देश आहे.
विवेकानंद रॉक मेमोरियल बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• विवकानंद स्मारक हे, कन्याकुमारी येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे .
• हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून 500 मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे.
• विवेकानंद स्मारक समितीने 1970 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले.
• स्वामी विवेकानंद याच खडकांवर ध्यानास बसले होते.
• असे मानले जाते की स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस या खडकावर ध्यान केल्यावर त्यांना ज्ञान प्राप्त झाले.