
चालू घडामोडी 02, जानेवारी 2025 | महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन | Maharashtra Police Raising Day

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन
Maharashtra Police Raising Day
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
Subject : GS - महाराष्ट्र पोलीस
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज केव्हा प्रदान केला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती 2023, 2021, 2016, .....)
1. 2 जानेवारी 1961
2. 26 जानेवारी 1961
3. 1 मे 1960
4. 2 ऑक्टोबर 1961
उत्तर : 2 जानेवारी 1961
• राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला.
• पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले.
• गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत वारंवार विचारलेले IMP प्रश्न :
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस वर्धापन (स्थापना) दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते ?
• “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे.
• महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो.
प्रश्न) राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते ?
• राज्य पोलीस दलाचे नियतकालिक दक्षता हे मुखपत्र आहे.
• दक्षता हे मासिक आहे म्हणजे हे दर महिन्याला प्रसिद्ध होते.
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपारिक चिन्ह कोणते ?
पंचकोनी तारा
प्रश्न) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभय निदर्शक म्हणून कोणते चिन्ह आहे ?
हाताचा पंजा
प्रश्न) राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
पोलीस महासंचालक
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
मुंबई
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे ?
नाशिक
प्रश्न) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?
पुणे
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे ?
पुणे
प्रश्न) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे ?
पुणे