
चालू घडामोडी 03, जानेवारी 2025 | मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार | Major Dhyan Chand Khel Ratna Awards 2024

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
Major Dhyan Chand Khel Ratna Awards 2024
बातमी काय आहे ?
• क्रीडा क्षेत्रातले सर्वात प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली.
• 17 जानेवारी 2025 रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
Subject : GS - खेळ, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024, खालील पैकी कोणाला देण्यात येणार आहे ?
1. श्री हरमनप्रित सिंग
2. श्री प्रवीणकुमार
3. श्री डी. गुकेश
4. वरील सर्वांना
उत्तर : वरील सर्वांना
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?
1. बुध्दिबळ विश्वविजेता डी. गुकेश
2. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदकं जिंकणारी मनु भाकर
3. भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रित सिंग
4. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ॲथलिट प्रवीणकुमार यांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024, पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ मिळणारा सर्वात युवा खेळाडू कोण ?
हा पुरस्कार मिळवणारा डी. गुकेश सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ कोणाला देण्यात येतो ?
मागील 4 वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम, नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 1991- 1992 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
• या पुरस्काराचे पूर्वीचे नाव राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार असे होते.
• भारत सरकारने 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ विजेते पहिले व्यक्ती कोण ?
बुद्धिबळ ग्रँडमास्टर श्री विश्वनाथन आनंद हे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे’ पहिले विजेते होते.

मेजर ध्यानचंद यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला.
• मेजर ध्यानचंद हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एक प्रमुख हॉकीपटू होते.
• त्यांच्या हॉकी खेळातील प्रभुत्व आणि खेळाची समज यामुळे त्यांना “हॉकीचा जादूगार” म्हणून आोळखले जाते.
• 1928, 1932 आणि 1936 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताने हॅटट्रिक साधत सलग तीन वर्षे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकली त्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
• 1926 ते 1948 दरम्यान त्यांनी भारतासाठी 185 सामने खेळून 400 हून अधिक गोल केले.
• 1956 मध्ये ते भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून ते निवृत्त झाले.
पुरस्कार आणि सन्मान :
• 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.
• 2012 मध्ये, भारत सरकारने 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
• त्यांचा सन्मान करण्यासाठी, भारत सरकारने 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले.