
चालू घडामोडी 07, जानेवारी 2025 | गुरू गोविंद सिंग जयंती | Guru Gobind Singh Jayanti

गुरू गोविंद सिंग जयंती
Guru Gobind Singh Jayanti
गुरू गोविंद सिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केव्हा केली ?
1. 1598
2. 1642
3. 1699
4. 1700
उत्तर : 1699
प्रकाश पर्व म्हणजे काय ?
• शिख धर्माचे दहावे आणि अंतिम गुरू ,गुरू गोविंद सिंग यांची यंदा, 6 जानेवारी 2025 तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली.
• दरवर्षी पौष शुक्ल सप्तमीला शीख अनुयायी गुरू गोविंद सिंग यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करतात.
गुरू गोविंद सिंग यांबद्दल थोडक्यात माहिती :
• गुरू गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 साली बिहारमधल्या पटनासाहेब इथे झाला होता.
• गुरू गोविंद सिंग हे केवळ दहा वर्षाचे असतानाचं गुरू बनले होते.
• गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु आणि शेवटचे गुरू होते.
• आपल्यानंतर शिखांचा पवित्र धर्मग्रंथ " ग्रंथसाहिब " यास गुरुस्थानी मानावे, असा आदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.
गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केव्हा केली ?
• अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी गुरू गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली.
• गुरु गोविंद सिंग यांनी शिख अस्मितेचे प्रतीक पंच ककार’ - केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण सादर केले.
निधन :
7 ऑक्टोबर 1708 रोजी वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी गुरुगोविंद सिंग यांचे महाराष्ट्रातील नांदेड येथे निधन झाले.