
चालू घडामोडी 06, जानेवारी 2025 | मराठी पत्रकार दिन | Marathi Journalism Day

मराठी पत्रकार दिन
Marathi Journalism Day
Subject : GS - दिनविशेष, इतिहास- महाराष्ट्रातील समाजसुधारक,
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी मराठी पत्रकार दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 2 जानेवारी
2. 6 जानेवारी
3. 8 मार्च
4. 1 मे
उत्तर : 6 जानेवारी
मराठी पत्रकार दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
• आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे.
• यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र " दर्पण " 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते.
• त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
• पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• त्यांचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभूर्ले या ठिकाणी 1812 रोजी झाला.
• मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार, व्यासंगी पंडित, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत अशा वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखले जाते.
• सरकारच्या वतीने अक्कलकोटचे युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.
• स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते.
• त्यांनी विधवा विवाह चा पुरस्कार केला तर बालविवाह, सती प्रथा यांचा विरोध केला.
• 1840 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली गेली.
• आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी नेटिव्ह इम्प्रूमेंट सोसायटीची (Native Improvement Society) स्थापना केली.
• 17 मे 1846 रोजी बनेश्वर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.
नोट : त्यांची नक्की जन्मतारीख माहीत नाही.