
चालू घडामोडी 06, जानेवारी 2025 | भारतात कोठे आढळला HMPV चा पहिला रुग्ण ? | What is HMPV ?

भारतात कोठे आढळला HMPV चा पहिला रुग्ण ?
What is HMPV ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण कोठे आढळून आला ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. कर्नाटक
4. दिल्ली
उत्तर : कर्नाटक
बातमी काय आहे ?
• गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये एचएमपी (HMPV) विषाणूमुळे श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढली आहे.
• जागतिक आरोग्य संघटना चीनमधल्या परिस्थितीबद्दल तसंच सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दल सातत्यानं माहिती देत आहे.
HMPV विषाणू म्हणजे काय ?
HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्युमो व्हायरस
(HMPV - Human Metapneumovirus)
• ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HPMV) हा श्वसनाच्या तीव्र संसर्गाचं प्रमुख कारण आहे.
• हा हंगामी रोग असून त्यामुळं श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो.
HMPV विषाणू सर्व प्रथम कोठे आणि केव्हा शोधला गेला ?
नेदरलँड्समधील शस्त्रज्ञांनी 2001 मध्ये याची पहिल्यांदा ओळख पटवली होती.
HMPV या विषाणूचा प्रसार कसा होतो ?
• खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्याठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो.
• हाथ मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो.
HMPV संसर्गाची लक्षणं काय आहेत ?
यामुळं रुग्णाला ताप येणं, खोकला, नाक बंद होणं, घशात खवखव, श्वास घेण्यास अडथळा येणं अशा स्थितींचा सामना करावा लागू शकतो.
लहान मुले आणि वृद्ध जणांवर या विषाणूचा जास्त परिणाम दिसून येतो.
HMPV विषाणू वर लस उपलब्ध आहे का ?
HMPV विषाणू साठी सध्या कोणतीही लस ( Vaccine) उपलब्ध नाही.
भारतात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण कोठे आढळून आला ?
• केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार कर्नाटकमध्ये (बंगळुरू) HMPV विषाणूची दोन जणांना लागण झाली आहे. 3 महिने आणि 8 महिन्यांच्या अशा दोन बालकांना या विषाणूची लागण झाली आहे.
• या दोन लहान बाळापैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.