
चालू घडामोडी 06, जानेवारी 2025 | राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार | National Sports Awards

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
National Sports Awards
Subject : GS - खेळ, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 साठी ‘अर्जुन पुरस्कार’ किती व्यक्तींना देण्यात येणार आहे ?
1. 4
2. 23
3. 32
4. 45
उत्तर : 32
बातमी काय आहे ?
• युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नुकतेच 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले.
• राष्ट्रपती 17 जानेवारी 2025 रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात करणार आहेत.
• राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार’ दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे प्रकार कोणते ?
1. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
2. अर्जुन पुरस्कार
3. द्रोणाचार्य पुरस्कार
4. मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक
5. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो ?
• मागील चार वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम, नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो.
• मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 साठी डी. गुकेश, मनु भाकर, हरमनप्रित सिंग आणि प्रवीण कुमार या 4 जणांना देण्यात येणार आहे.

‘अर्जुन पुरस्कार’ कोणाला दिला जातो ?
• ‘अर्जुन पुरस्कार’ चार वर्ष सातत्याने खेळामध्ये प्रावीण्यासह नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती व शिस्तीचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
• ‘अर्जुन पुरस्कार’ 2024 साठी एकूण 32 जणांची निवड करण्यात आली आहे.
• पुण्यातल्या सचिन खिलारी या दिव्यांग गोळाफेकपटूला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
• कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळेला (नेमबाजी) अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)’ कोणाला दिला जातो ?
आपल्या कारकिर्दीत क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या क्रीडा प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी त्यांना ‘अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)’ प्रदान करण्यात येतो.

‘द्रोणाचार्य पुरस्कार’ कोणाला दिला जातो ?
• क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ अशा प्रशिक्षकांना दिला जातो; जे आपल्या शिष्यांना सातत्याने सर्वोत्तम कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सराव करुन घेतात.
• द्रोणाचार्य पुरस्कार मुंबईतल्या मुलुंड इथल्या नेमबाज प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना जाहीर झाला आहे.

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक कोणाला दिला जातो ?
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये अग्रक्रमांकावर असलेल्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक प्रदान करण्यात येईल.
