
चालू घडामोडी 08, जानेवारी 2025 | गरुडाक्षी म्हणजे काय ? | ‘Garudakshi’ online FIR system

गरुडाक्षी म्हणजे काय ?
‘Garudakshi’ online FIR system
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वन्यजीव आणि वन गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी खालील पैकी कोणत्या राज्याने गरुडाक्षी’ ऑनलाइन FIR प्रणाली सुरू केली आहे ?
1. महाराष्ट्र
2. झारखंड
3. पश्चिम बंगाल
4. कर्नाटक
उत्तर : कर्नाटक
बातमी काय आहे ?
अलीकडेच, कर्नाटक वनविभागाने जंगलातील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार आणि वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी ‘गरुडाक्षी’ ऑनलाइन FIR प्रणाली सुरू केली आहे.
‘गरुडाक्षी’ प्रणाली बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ‘गरुडाक्षी’ हे वन आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वन गुन्ह्यांची ऑनलाइन हाताळणी सक्षम करेल.
• वन्यजीव आणि वन गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हे सॉफ्टवेअर ऑनलाइन FIR प्रणालीवर आधारित आहे.
• सॉफ्टवेअरमध्ये लेगसी केस रजिस्ट्रेशन मॉड्युल, ऑनलाइन फॉरेस्ट ऑफेन्स रजिस्ट्रेशन, इन्व्हेस्टिगेशन मॉड्युल आणि रिपोर्टिंग आणि ॲनालिटिक्स मॉड्यूल यांचा समावेश आहे.
• गरुडाक्षी प्रणालीद्वारे नागरिकांना मोबाइल किंवा ईमेलच्या माध्यमातून वन गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.
• भारतीय वन्यजीव ट्रस्टच्या (Wildlife Trust of India) सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.