
चालू घडामोडी 09, जानेवारी 2025 | 18 वा प्रवासी भारतीय दिवस कोठे आयोजित करण्यात आला ? | 18 th Pravasi Bharatiya Divas

18 वा प्रवासी भारतीय दिवस कोठे आयोजित करण्यात आला ?
18 th Pravasi Bharatiya Divas
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रवासी भारतीय दिवसा बद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
1. प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीला साजरी करतात.
2. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
3. या वर्षाची संकल्पना “विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान” अशी आहे.
4. वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
बातमी काय आहे ?
पुढील वर्षी प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन ओडिशा करणार आहे.
8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
18 व्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे ?
“विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान” ही 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना आहे.
“Diaspora's Contribution to a Viksit Bharat”
प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ? आणि का ?
देशाच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे महत्त्व ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरी करण्यात येतो.
प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीलाच का साजरी करतात ?
• 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.
• त्यांच्या आगमनाच्या स्मरणार्थ प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीला साजरी करतात.
पहिला प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केव्हा करण्यात आले ?
• पहिल्या प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजन 9 जानेवारी 2003 मध्ये करण्यात आले.
• 2003 पासून 2015 पर्यंत या दिवसाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत होते.
• परंतु 2015 पासून, सुधारित स्वरूपात, प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन दर 2 वर्षांनी एकदा केले जाते.
• 17 वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2023 मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथे पार पडला.
• 18 वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2025 मध्ये ओडिशाच्या भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार म्हणजे काय ?
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोणाला दिला जातो ?
Pravasi Bharatiya Samman Award
• अनिवासी भारतीय (Non-Resident Indian) किंवा भारतीय वंशाची व्यक्ती (Person of Indian Origin)
• त्याचप्रमाणे अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींनी स्थापन केलेल्या आणि चालवलेल्या संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देण्यात येतो.
• प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींद्वारे देण्यात येतो.