
चालू घडामोडी 11, जानेवारी 2025 | सिंधू संस्कृती लिपी | Deciphering the Indus Script

सिंधू संस्कृती लिपी
Deciphering the Indus Script
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती, सिंधू संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस खालील पैकी कोणत्या राज्याने जाहीर केले आहे ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. आंध्र प्रदेश
4. तामिळनाडू
उत्तर : तामिळनाडू
बातमी काय आहे ?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.
सिंधू संस्कृती (हडप्पा संस्कृती) म्हणजे काय ?
• भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती.
• सिंधू नदीचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे केंद्रस्थान असल्याने हिला सिंधू संस्कृती (Indus Valley Civilization) असे नाव देण्यात आले.
• सिंधू खोरे संस्कृती ज्याला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते, ती इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1500 दरम्यान विकसित झाली.
• जी सध्याच्या भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये पसरली आहे.
सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला ?
• 1920 च्या दशकाच्या सुरुवातीस ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ सर जॉन मार्शल आणि त्यांच्या टीमने सिंधू संस्कृतीचा प्रथम शोध लावला.
• भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ दया राम साहनी आणि राखालदास बॅनर्जी यांनी हडप्पा संस्कृती संदर्भात महत्त्वाची शहरे शोधून काढली .
सिंधू संस्कृती लिपी कशी आहे ?
• सिंधूच्या खोऱ्यातील लोकांना लेखनकला अवगत होती, हे या उत्खननांवरून समजले म्हणूनच या लिपीला ‘सिंधुलिपि’ असे नाव देण्यात आले.
• जॉन मार्शल यांच्या मते नांगरटीच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि दुसरी ओळ डावीकडून उजवीकडे अशी क्रमशः ही लिपी लिहिली जात असावी.
• सिंधू लिपी लिहिण्याच्या या पद्धतीला बुस्ट्रोफेडन शैली (Boustrophedon Style) असे म्हणतात.
• सिंधू लिपीत चित्रे आणि आकृत्या कोरलेल्या दिसतात.
• उदाहरणार्थ : संशोधकांनी सिंधु लिपीतील मनुष्याकृती, मत्स्याकृती, पक्ष्यांच्या आकृती, कुंभ, फुली, शिंगे, चक्रे, धनुष्यबाण, पाणी, डोंगर, कमानी, झाडे, भौमितिक आकृत्या इ. प्रकारे वर्गीकरण केले आहे.