
चालू घडामोडी 10, जानेवारी 2025 | रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार | Cashless Treatment For Road Accident Victims

रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार
Cashless Treatment For Road Accident Victims
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली. त्यासंदर्भात योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) या योजनेद्वारे पीडिताच्या उपचारांवर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
ब) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
बातमी काय आहे ?
• नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली.
• रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच एक देशव्यापी कॅशलेस उपचार उपक्रम सुरू केला आहे. ज्याचा उद्देश रस्ते अपघातातील पीडितांना आवश्यक सहाय्य प्रदान करणे आहे.
काय आहे कॅशलेस ट्रीटमेंट ?
• या योजनेद्वारे अपघात झाल्यानंतर 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे.
• या योजनेद्वारे पीडिताच्या उपचारांवर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
• याचबरोबर हिट अँड-रन प्रकरणांमध्ये, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
• दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.
भारतातील रस्ते अपघात आकडेवारी :
(Road Accident Statistics in India)
• 2024 मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे 1.80 लाख लोकांनी आपला जीव गमावला.
• त्यापैकी 30,000 मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाले.
• वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुणांची संख्या मोठी होती.
• 2024 मध्ये शाळा आणि महाविद्यालयांजवळील पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अंदाजे 10,000 मुलांना आपला जीव गमवावा लागला.