मकर संक्रांत
MAKAR SANKRANTI
🪁🪁 सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌞🪁🪁
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) " पोंगल " हा भारतातील कोणत्या राज्यातील सुगीचा सण आहे ?
(सरळसेवा, महाराष्ट्र पोलीस, SSC 2019)
1. उत्तर प्रदेश
2. राजस्थान
3. पंजाब
4. तमिळनाडू
उत्तर : तमिळनाडू (Tamil Nadu)
मकर संक्रांती का आणि केव्हा साजरी केली जाते ?
• मकर संक्रांती साधारणपणे 14 जानेवारी रोजी किंवा एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर बघावयास मिळते.
• यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांति साजरी केली जात आहे.
• या दिवशी लोक पतंग उडवतात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. महाराष्ट्रात तिळगुळ वाटतात.
सूर्याचे उत्तरायण सुरू होते :
• प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते.
• सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत.
• यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते.
• आणि दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
सुगीचा सण
• सुगीचा सण म्हणजे पिक कापणीचा सण
• मकर संक्रांती हा सण सुगीचा सण Harvesting Festival म्हणून ही ओळखला जातो.
• जसे की तमिळनाडू मध्ये पोंगल
• पंजाब, हरियाणा मध्ये लोहरी.
पौराणिक कथा
• हिंदू पौराणिक कथांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता आपला पुत्र शनि देवास भेटण्यासाठी जातात.
• शनिदेव हे मकर राशीचे प्रतीक मानले जातात.
• अशी मान्यता आहे की आई-वडील-मुलगा यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी वडील आपल्या मुलास त्या दिवशी भेटतात व आनंद आणि गोडवा पसरवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देतात.
• मकरसंक्रातीचा महाभारतातील सिद्धांत असे सांगतो की, भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला.
वेगवेगळ्या राज्यात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
( स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यांची नावे आणि तिथे सणाला काय म्हणतात अशी योग्य जोडी ओळखण्यासाठी प्रश्न विचारले आहेत ते आपण शेवटी बघू )
तामिळनाडू :
• मकर संक्रांति हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो.
• पोंगल सण राज्यातील एक महत्त्वाचा सण आहे.
• हा सण एकूण चार दिवस चालतो.
• या सणादरम्यान लोक कापणी केलेल्या नवीन तांदूळ, मसूर, गूळ आणि दुधापासून बनवला जाणारा पोंगल नावाचा एक खास पदार्थ तयार करतात.
आंध्र प्रदेश :
• मकर संक्रांती आंध्र प्रदेशमध्ये पेड्डा पांडूगा म्हणून साजरा केला जातो.
• आंध्र प्रदेश राज्यात विशेषता राज्याच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
• या दिवशी लोक बैलगाड्याची शर्यत तसेच कोंबड्यांची झुंज अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात.
केरळ :
• केरळमध्ये मकर संक्रांति मकरविल्लक्कू म्हणून साजरी केली जाते.
• या दिवशी साबरीमाला मंदिरात प्रकट होणाऱ्या दिव्य प्रकाशाचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंदिरात मोठ्या प्रमाणात जमा होतात.
गुजरात :
• मकर संक्रांति हा सण गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून साजरा केला जातो.
• या दिवशी 1989 पासून गुजरात सरकार द्वारे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव (International Kite Festival) आयोजित केला जातो.
शिशुर संक्रांत - जम्मू आणि काश्मिर
लोहरी - पंजाब, हरियाणा
माघी - हिमाचल प्रदेश
उत्तरायण - गुजरात, राजस्थान
खिचडी - उत्तर प्रदेश
मकर संक्रांती - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड
मकर संक्रमणा - कर्नाटक
मकर विलाक्कू - केरळ
पोंगल - तमिळनाडू
पेड्डा पांडुगा - आंध्र प्रदेश
पौष संक्रांती - पश्चिम बंगाल
माघबिहू - आसाम, मेघालय ( ईशान्य भारतातील राज्य)