
चालू घडामोडी 13, जानेवारी 2025 | राजमाता जिजाऊ जयंती | Rajmata Jijau Birth Anniversary

राजमाता जिजाऊ जयंती
Rajmata Jijau Birth Anniversary
राजमाता जिजाऊ यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा 🙏💐💐
Subject : GS - इतिहास- मराठ्यांचा इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राजमाता जिजाऊ यांचा जन्म खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाला ?
1. रायगड जिल्हा
2. नाशिक जिल्हा
3. बुलढाणा जिल्हा
4. सातारा जिल्हा
उत्तर : बुलढाणा जिल्हा
जन्म आणि शिक्षण :
• जिजामाता हयांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
• त्यांचे वडील लखूजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते.
• जिजाऊंना उत्तम शिक्षण मिळाले होते त्यांना राजनीती, युद्धनीती, इतिहास, धर्म आणि तत्वज्ञान यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान होते.
• त्याचबरोबर राजमाता शस्त्रविद्या आणि प्रशासनातही निपुन होत्या.
विवाह आणि छत्रपतींचे संगोपन :
• मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे जिजामातांचा विवाह झाला.
• राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री.
• त्यांनी बाल शिवबांना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरीतील कथा सांगितल्या.
• शांतिपर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या.
• राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचे ही संगोपन केले.
स्वराज्याचे प्रेरणास्थान :
• राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संगोपन करताना त्यांना तत्कालीन राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली.
• राजमातांनी छत्रपतींना परकीय राजवटीच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
• त्यांच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला.
प्रशासकीय कौशल्य :
• राजमाता जिजाऊ महाराजांच्या राज्यकारभारात जातीने लक्ष घालीत.
• राजमातांचा अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत झाला.
• राज्यकारभारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत.
• महाराज आग्राभेटीवर गेले असता त्यांनी स्वराज्याचा कारभार राजमाता जिजाऊंच्या हाती सुपुर्द केला होता.
निधन :
• रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी 17 जून 1674 रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला.
• रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाऊंची समाधी आहे.