
चालू घडामोडी 15, जानेवारी 2025 | मिशन मौसम काय आहे ? | What is the Mission Mausam ?

मिशन मौसम काय आहे ?
What is the Mission Mausam ?
Subject : GS - सरकारी योजना, पर्यावरण, भूगोल, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच मिशन मौसमचे उद्घाटन करण्यात आले. मिशन मौसम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. नौदल युद्ध अभ्यास
2. नक्षलविरोधी कारवाई
3. हवामान संबंधित विज्ञान आणि संशोधन
4. यांपैकी नाही
उत्तर : हवामान संबंधित विज्ञान आणि संशोधन
बातमी काय आहे ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे मिशन मौसम चे उद्घाटन केले.
मिशन मौसम काय आहे ?
• मिशन मौसम हा भारत सरकारचा एक उपक्रम असून ज्याचा उद्देश भारताच्या हवामान विभागाच्या हवामान अंदाज, मॉडेलिंग आणि प्रसारामध्ये क्षमता वाढवणे आहे.
• देशाला, हवामान आणि वातावरणाप्रती सजग आणि स्मार्ट देश बनवण्याच्या उद्दिष्टानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
• अचूक, तातडीने आणि ठिकाणानुसार हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘मिशन मौसम’ सुरू केला आहे.
• यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे.
मिशन मौसम फायदेशीर कसे ठरेल ?
• मान्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेसाठी माहिती, अत्यंत प्रतिकूल हवामान घटना आणि चक्रीवादळे, धुके, गारपीट आणि पाऊस यासंदर्भात अचूक आणि वेळेवर माहिती प्रदान करण्यासाठी क्षमता निर्माण करणे.
• मिशन मौसमचा एक भाग म्हणून, भारत वातावरणीय विज्ञान, विशेषत: हवामान निरीक्षण, मॉडेलिंग, अंदाज आणि व्यवस्थापन यातील संशोधन आणि विकास तसेच क्षमता यात वेगाने विस्तार करेल.
• प्रगत सेन्सर्स आणि उच्च-कार्यक्षमतेच्या सुपर कॉम्प्युटर सह नव्या पिढीचे रडार आणि उपग्रह प्रणाली यासाठी समाविष्ट केले जातील.
• देशातील हवामान अंदाज सुधारण्याबरोबरच काही हवामानासंबंधीच्या घटनांचे व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतेनुसार पाऊस, गारपीट, धुके अशा आपत्तींवर नियंत्रण मिळवणे देखील आहे.
• उदाहरणार्थ : कृत्रीम पाऊस पाडणे इत्यादी.
मिशन मौसम हे 5 वर्षांत 2 टप्प्यांत राबवले जाईल.
1. पहिला टप्पा (2025 - मार्च 2026): सुमारे 70 डॉप्लर रडार, उच्च-कार्यक्षमता संगणक, विंड प्रोफाइलर आणि रेडिओमीटर जोडून निरीक्षण नेटवर्कचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
2. दुसरा टप्पा (2026 नंतर): उपग्रह आणि विमानांच्या वापर करून हवामान निरीक्षण क्षमतांमध्ये आणखी वाढ करणे
मिशन मौसम कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्यात येणार आहे ?
मिशन मौसम प्रामुख्याने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) अंतर्गत राबविण्यात येणार आहे.