
चालू घडामोडी 15, जानेवारी 2025 | भारतीय सेना दिवस 2025 | Indian Army Day 2025

भारतीय सेना दिवस 2025
Indian Army Day 2025
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 77 वा भारतीय सेना दिवस संचलन (आर्मी डे परेड) चे आयोजन खालील पैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
1. नवी दिल्ली
2. पुणे
3. मुंबई
4. चेन्नई
उत्तर : पुणे
आर्मी डे का साजरा केला जातो ?
• 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताचे लष्करप्रमुख ब्रिटिश अधिकारीच होते.
• आर्मी डे हा भारतीय सैन्याची कमांड ब्रिटीश अधिकाऱ्याकडून भारतीय अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केल्याबद्दल चिन्हांकित करतो.
• 15 जानेवारी 1949 रोजी, के एम करिअप्पा, एक भारतीय जनरल यांनी ब्रिटीश जनरल सर बुचर यांच्याकडून लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
• 15 जानेवारी या दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे भारतीय लष्कराला कमांड देणारे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ बनले.
• भारतीय लष्करातील या महत्त्वाच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस भारतात सेना दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतीय सेना दिवस 2025
• यंदाचा हा 77वा भारतीय सेना दिवस (भारतीय लष्कर दिन) आहे.
• यंदाची आर्मी डे परेड पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
• पुणे येथे पहिल्यांदाच ही परेड आयोजित करण्यात आली आहे.
नवी दिल्लीबाहेर तिसरी आर्मी डे परेड :
• पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात सुरूवात झाली.
• 2023 ची आर्मी डे परेड कर्नाटकातील बेंगळुरू
• 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये
• आणि 2025 चे संचलन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय सेना दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" समर्थ भारत सक्षम सेना " ही भारतीय सेना दिवस 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
Samarth Bharat, Saksham Sena