
चालू घडामोडी 15, जानेवारी 2025 | भारतीय हवामानशास्त्र विभाग स्थापना दिन | India Meteorological Department's 150th Anniversary

भारतीय हवामानशास्त्र विभाग स्थापना दिन
India Meteorological Department's 150th Anniversary
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण, भूगोल, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
1. 1875
2. 1900
3. 1948
4. 1982
उत्तर : 1875
बातमी काय आहे ?
• भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department) ने 15 जानेवारी 2025 रोजी आपला 150 वा वर्धापन दिन साजरा केला.
• कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेले 150 रुपयांचे नाणे देखील जारी केले.
भारतीय हवामानशास्त्र विभागा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 15 जानेवारी 1875 रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली.
भारतीय हवामानशास्त्र विभाग कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करते ?
• भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) अंतर्गत काम करते.
• भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) देशाला हवामानविषयक सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय (Headquarters) कोठे आहे ?
नवी दिल्ली येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे.
हवामानशास्त्र विभागाची उद्दिष्टे काय आहेत ?
हवामानशास्त्र विभाग काय काम करते ?
• हवामानाच्या विविध घटकांची सतत निरीक्षणे करणे, त्यांचे विश्लेषण व त्यावर आधारित सद्यस्थितीचे व पुढील काळासाठीच्या हवामानाचे पुर्वानुमान करणे.
• उष्णकटिबंधीय वादळे, धुळीची वादळे, अतिवृष्टी, उष्णतेची व थंडीची लाट, विजा कोसळणे, हवेतील प्रदूषणाची पातळी वाढणे यासारख्या तीव्र हवामानाच्या आपत्तींचे विभागनिहाय पुर्वानुमान वर्तवणे व त्यासंबंधी योग्य तो इशारा देणे.
• ही माहिती कृषी, जलसंधारण, नौकानयन, मच्छीमार, हवाई वाहतूक, समुद्रातील इंधन शोधन इ. क्षेत्रांना नियमितपणे पुरविणे.
• हवामानशास्त्र व त्याला संलग्न असलेल्या विषयात संशोधन करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
जागतिक भूमिका
• भारतीय हवामानशास्त्र विभाग हा जागतिक हवामानशास्त्र परिषदेच्या (World Meteorological Organization) सहा विशेष क्षेत्रिय हवामानशास्त्र केंद्रांपैकी एक आहे.
• या केंद्रावर मलाक्का सामुद्रधुनीसह उत्तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पर्शियाचे आखात येथील विषुवृत्तीय वादळांचा अंदाज देणे व तो सर्वत्र पोहचविणे तसेच त्या वादळाचे नामकरण करणे या विशेष जबाबदाऱ्या आहेत.