
चालू घडामोडी 16, जानेवारी 2025 | राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना | National Turmeric Board

राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना
National Turmeric Board
Subject : GS - भूगोल, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 14 जानेवारी 2025 रोजी नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. तेलंगणा
4. कर्नाटक
उत्तर : तेलंगणा
बातमी काय आहे ?
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 14 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय तेलंगणाच्या निजामाबाद येथे आहे.
राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण ?
राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी असणार आहेत.

नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे महत्त्वाची भूमिका कोणती ?
राष्ट्रीय हळद मंडळ काय काम करेल ?
• नव्याने स्थापन झालेले मंडळ महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय यासह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देईल.
• हळद मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
• हळद उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल आणि परदेशात विपणनासाठी हळदीशी संबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष देईल.
• हळदीचे महत्वपूर्ण आणि वैद्यकीय गुणधर्म, त्याचे उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागरूकता निर्माण करेल.
राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य स्वरूप -
• राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी असणार आहेत.
• मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी देखील नामनिर्देशित करण्यात आले.
• महाराष्ट्र, तेलंगणा आणि मेघालय या राज्याचे प्रतिनिधी देखील मंडळाचा भाग असतील.