
चालू घडामोडी 18, जानेवारी 2025 | भारतातील पहिला खाजगी उपग्रह नेटवर्क | India’s first private satellite constellation ‘Firefly’

भारतातील पहिला खाजगी उपग्रह नेटवर्क
India’s First Private Satellite Constellation ‘Firefly’
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतातील पहिला खाजगी उपग्रह नेटवर्क कोणत्या कंपनीने लाँच केला.
1. ISRO
2. Pixxel
3. Reliance
4. Antrix
उत्तर : Pixxel
बातमी काय आहे ?
भारतीय खाजगी स्पेस-टेक कंपनी Pixxel ने भारतातील पहिला खाजगी उपग्रह नेटवर्क लाँच केला.
पिक्सेल आणि फायरफ्लाय बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पिक्सेल (Pixxel), बेंगळुरू येथील एक भारतीय अंतराळ स्टार्टअप आहे.
• Pixxel या कंपनीची सुरुवात अवैस अहमद आणि क्षितिज खंडेलवाल नावाच्या अभियंता मित्रांनी 2019 मध्ये केली होती.
पिक्सेलच्या फायरफ्लाय मोहिमेचे उपग्रह कोणी लाँच केले ?
फायरफ्लाय नक्षत्राचे पहिले तीन उपग्रह एलोन मस्कच्या स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीने लॉन्च केले.
फायरफ्लाय (Firefly) काय आहे ?
• फायरफ्लाय नाव असलेला हा पिक्सेलचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग (Hyperspectral Imaging) उपग्रह समुह आहे , ज्यामध्ये आजपर्यंतचे सहा उच्च-रिझोल्यूशन व्यावसायिक हायपरस्पेक्ट्रल उपग्रह आहेत.
• हा देशातील पहिला खाजगी इमेजिंग उपग्रह नेटवर्क (Satellite Constellation) आहे.
• फायरफ्लाय या मोहिमेत छोट्या उपग्रहांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
• हे सर्व छोटे उपग्रह एकत्र काम करतील आणि पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून डेटा गोळा करेल.
• हे विशेषतः उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा (Image) प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
पिक्सेलच्या फायरफ्लाय मोहिमेचा फायदा कसा होईल ?
• पिक्सेल हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान वापर करणार आहे.
• त्यामुळे शेती, खाणकाम, पर्यावरणीय देखरेख आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात याचा वापर होईल.
• हे भारतातील पीक उत्पादन सुधारण्यात, संसाधनांचा मागोवा घेण्यास, तेल गळतीचे निरीक्षण करण्यास आणि भौगोलिक सीमांवर संरक्षणात मदत करेल.