
चालू घडामोडी 17, जानेवारी 2025 | पहिला लोकपाल वर्धापनदिन | Lokpal Foundation Day

पहिला लोकपाल वर्धापनदिन
Lokpal Foundation Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, वैधानिक संस्था
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच भारताचा पहिला लोकपाल वर्धापन दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 2 जानेवारी
2. 10 जानेवारी
3. 16 जानेवारी
4. 26 जानेवारी
उत्तर : 16 जानेवारी
बातमी काय आहे ?
‘भारताच्या लोकपालांच्या पहिल्या वर्धापन दिन समारंभाचे 16 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.
भारताच्या लोकपालांची स्थापना केव्हा झाली ?
16 जानेवारी 2014 रोजी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 च्या कलम 3 च्या अंमलबजावणीमुळे भारताच्या लोकपालांची स्थापना झाली होती.
लोकपाल म्हणजे काय ?
• भ्रष्टाचाराच्या आरोपांची तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक आयुक्त संस्था स्थापन करण्यात आले.
• लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 मध्ये केंद्रातील चौकशीसाठी लोकपाल तर राज्यातील चौकशींसाठी लोकायुक्त पद स्थापन करण्याची तरतूद यात करण्यात आली.
• लोकपाल आणि लोकायुक्त संस्था वैधानिक संस्था आहेत.
लोकपाल संस्थेमध्ये किती सदस्य असतात ?
• लोकपाल ही बहुसदस्यीय संस्था आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
• या आठ सदस्यांपैकी निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्य SC/ST/OBC/ अल्पसंख्यांक आणि महिला असतील.
लोकपालांची नियुक्ती कोण करतात ?
राष्ट्रपती निवड समितीच्या शिफारशीनुसार लोकपालांची नियुक्ती करतात.
लोकपाल निवड समितीमध्ये कोण कोण असतात ?
• लोकपाल निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, लोकसभेचे अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले न्यायाधीश आणि एक प्रख्यात कायदे तज्ञ यांचा समावेश असतो.
लोकायुक्त यांची नियुक्ती कोण करतात ?
राज्यपाल निवड समितीच्या शिफारशीनुसार लोकायुक्तांची नियुक्ती करतात.
लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षांपर्यंत असतो.
लोकपाल किंवा लोकायुक्त संस्थेचे कार्य काय असते ?
• लोकपाल या शब्दाचा अर्थ लोकांचे संरक्षण करणे असा होतो.
• लोकपाल आणि लोकायुक्त लोकसेवकांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करतात.
लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात कोण कोण येतात ?
लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात पंतप्रधान, मंत्री, संसद सदस्य, गट अ, ब, क आणि ड अधिकारी तसेच केंद्र सरकारचे अधिकारी यांचा समावेश होतो.
लोकपाल आणि लोकायुक्त साठी कोणते आंदोलन झाले ?
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली " इंडिया अगेन्स करप्शन "आंदोलनाने सरकारवर दबाव आणला आणि लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक 2013 संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.
भारताचे सध्याचे लोकपाल अध्यक्ष कोण आहेत ?
न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर हे वर्तमान लोकपाल अध्यक्ष आहेत.
प्रश्न) भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत ?
( MPSC 2020 )
न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष हे भारताचे पहिले लोकपाल होते.