
चालू घडामोडी 18, जानेवारी 2025 | न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जयंती | Justice Mahadev Govind Ranade Birth Anniversary

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जयंती
Justice Mahadev Govind Ranade Birth Anniversary
महान समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, इतिहास - महाराष्ट्रातील समाजसुधारक
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ------ यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती.
(MPSC Combine B 2020 )
1. वि. दा. सावरकर
2. वि.वा. शिरवाडकर
3. न्यायमूर्ती रानडे
4. अनंत लक्ष्मण कान्हेरे
उत्तर : न्यायमूर्ती रानडे
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म आणि शिक्षण :
• न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला.
• त्यांचे मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले.
• तर माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले.
• इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA परीक्षा दिली.
• 1864 साली M.A ची परीक्षा दिली व 1865 साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती
• 1893 साली न्यायमूर्ती रानडेंची मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
• त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते.
• त्या प्रसंगी पुण्यातील जनतेने आठ दिवस मोठा उत्सव केला व पुण्यातील महत्त्वाच्या संस्थांनी त्यांचा गौरव केला.
शैक्षणिक आणि सामाजिक संस्था :
• 1865 साली न्यायमूर्ती रानडे यांनी मुंबईत विधवा विवाह उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना केली.
• 1870 साली न्यायमूर्ती रानडेंनी धर्म,समाज, राजकारण या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी वकृत्वोत्तेजक सभेची स्थापना केली.
• 1875 साली पुणे येथे वसंत व्याख्यानमाला सुरू केली.
• 1878 रोजी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापना केली
• 1896 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले या गुरू- शिष्यांनी डेक्कन सभेची स्थापना केली.
• सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली.
• न्यायमूर्ती रानडे यांचा काँग्रेसच्या स्थापनेत व पहिल्या अधिवेशनात सहभाग होता.
• राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव न्यायमूर्ती रानडेंनीच सुचविले होते.
" महाराष्ट्राचे सॅाक्रेटिस " कोणाला म्हटले जाते ?
• दिनशॅा वाच्छा यांच्या मते न्यायमूर्ती रानडे हे " महाराष्ट्राचे सॅाक्रेटिस " आहे.
• त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना सामाजिक परिक्षदांचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
• अरविंद घोष यांच्या मते न्यायमूर्ती रानडे हे " अर्वाचिन महाराष्ट्राचे जनक "
• तर लोकमान्य टिळक यांच्या मते न्यायमूर्ती रानडे हे " थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रास उब देऊन सजीव करणारे पहिले समाजसुधारक" होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या साहित्यांपैकी प्रमुख साहित्य :
• एकेश्वर निष्ठांची कैफियत
• राइझ ऑफ द मराठा पॉवर (मराठा सत्तेचा उदय)
• एसेज ॲान इंडियन पॉलिटिकल इकॉनोमी
पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
11 मे 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते.
मृत्यू :
मुंबई येथे दीर्घ आजाराने दिनांक 16 जानेवारी 1901 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले.