
चालू घडामोडी 18, जानेवारी 2025 | ला पेरुस युद्ध सराव | Exercise LA PEROUSE

ला पेरुस युद्ध सराव
Exercise LA PEROUSE
Subject : GS - संरक्षण, युद्ध अभ्यास
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘ला पेरूस’ या सागरी युद्ध सरावाचे आयोजन खालील पैकी कोणत्या देशाकडून करण्यात आले ?
1. भारत
2. फ्रान्स
3. जर्मनी
4. स्पेन
उत्तर : फ्रान्स (France)
बातमी काय आहे ?
स्वदेशी बनावटीची आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका ‘INS मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’ च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे.
‘ला पेरूस’ युद्ध सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हिंद महासागर क्षेत्रात होणारा हा बहुपक्षीय सागरी सराव आहे.
• फ्रेंच नौदलाकडून ला पेरुस या द्विवार्षिक (दर दोन वर्षांनी) युद्ध सरावाचे आयोजन करण्यात येते.
• 2025 मधील ‘ला पेरूस’ या बहुराष्ट्रीय सरावाची ही चौथी आवृत्ती आहे.
• हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीमध्ये हा युद्ध सराव होईल.
2025 मधील ‘ला पेरूस’ या सरावात कोण कोणते देश सहभागी झाले ?
या आवृत्तीत
- इंडियन नेव्ही,
- रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही,
- फ्रेंच नेव्ही,
- रॉयल नेव्ही,
- युनायटेड स्टेट्स नेव्ही,
- इंडोनेशियन नेव्ही,
- रॉयल मलेशियन नेव्ही,
- रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि
- रॉयल कॅनेडियन नेव्ही
यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल.
‘ला पेरूस’ युद्ध सरावाचे उद्दिष्ट काय आहे ?
• या सरावाचे उद्दिष्ट सागरी देखरेख, सागरी प्रतिबंधात्मक कारवाई आणि हवाई कारवाई क्षेत्रात सहकार्य वाढविणे.
• तसेच प्रगतीशील प्रशिक्षण आणि माहितीची देवाणघेवाण करून सामान्य सागरी परिस्थिती बाबत जागरूकता विकसित करणे हे आहे.
• या सरावामुळे समान विचारसरणीच्या नौदलांना नियोजन, समन्वय आणि माहितीच्या देवाणघेवाणीत परस्पर संबंध विकसित करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या सामरिक आंतरकार्यक्षमता वाढण्यास मदत होइल.