
चालू घडामोडी 21, जानेवारी 2025 | मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय स्थापना दिन

State Foundation Day of Meghalaya, Manipur and Tripura
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, भूगोल
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा केव्हा मिळाला ?
1. 21 जानेवारी, 1956
2. 21 जानेवारी, 1960
3. 21 जानेवारी, 1972
4. 21 जानेवारी, 1978
उत्तर : 21 जानेवारी, 1972
बातमी काय आहे ?
• महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
• ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय स्थापना दिन केव्हा असतो ?
• भारतातील तीन प्रमुख ईशान्येकडील राज्ये, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय दरवर्षी 21 जानेवारी रोजी त्यांचा राज्य स्थापना दिन साजरा करतात.
• हा दिवस या राज्यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व प्रतिबिंबित करतो.
मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा केव्हा मिळाला ?
• 21 जानेवारी, 1972 रोजी, तिन्ही राज्ये ईशान्य क्षेत्र (पुनर्गठन) कायदा, 1971 अंतर्गत पूर्ण राज्ये बनली.
मणिपूर राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मणिपूर चा अर्थ "रत्नजडित जमीन" असा होतो.
• मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ आहे.
• मणिपूर राज्याला लागून म्यानमार देशाची सीमा आहे.
त्रिपुरा राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• त्रिपुरा राज्याला लागून बांगलादेश देशाची सीमा आहे.
• बांगलादेशने भारताच्या त्रिपुरा राज्याला उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशांनी वेढलेले आहे.
• आगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे.
मेघालय राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मेघालय, या शब्दशः अर्थ ढगांचे निवासस्थान असा होतो, हे राज्य प्रामुख्याने डोंगराळ राज्य आहे.
• मेघालय राज्याची राजधानी शिलाँग आहे.
• मेघालय भारतामधील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य आहे.
• मावसीनराम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मेघालय राज्यात आहे.
• त्याचबरेर चेरापुंजी हे ठिकाणही मेघालय राज्यात आहे.
• मेघालय राज्यात प्रामुख्याने गारो, खासी आणि जयंतिया या आदिवासी समुदायाचे लोक राहतात.
• गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या मेघालय राज्यात आहे.