
चालू घडामोडी 20, जानेवारी 2025 | पहिला खो-खो वर्ल्ड कप कोणी जिंकला ?

पहिला खो-खो वर्ल्ड कप कोणी जिंकला ?
Who Win Kho Kho World Cup 2025
Subject : GS - खेळ
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महिलांचा पहिला खो-खो विश्वचषक खालील पैकी कोणी जिंकला ?
1. भारत
2. नेपाळ
3. श्रीलंका
4. चीन
उत्तर : भारत
बातमी काय आहे ?
• भारताच्या महिला संघ आणि भारताच्या पुरुष संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला.
• भारतीय पुरुष खो खो संघाने अंतिम फेरीत नेपाळचा 54-36 असा पराभव केला.
• तर भारताच्या महिला संघाने नेपाळच्या महिला संघाचा 78-40 ने पराभव केला.
खो-खो विश्वचषक महिला :
• विजेता संघ : भारत
• उपविजेता संघ : नेपाळ

खो-खो विश्वचषक पुरूष :
• विजेता संघ : भारत
• उपविजेता संघ : नेपाळ

खो-खो विश्वचषकासाठी भारताच्या महिला संघाची कर्णधार कोण ?
भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमआंबा गावातील प्रियंका इंगळे

खो-खो विश्वचषकासाठी भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार कोण ?
पुण्याचा प्रतीक वायकर हा भारतीय खो खो संघाच्या कर्णधार आहे.

पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले ?
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खो-खो खेळात प्रत्येक संघाकडून किती खेळाडू मैदानावर खेळतात ?
प्रत्येक संघातील फक्त 9 खेळाडू एकावेळी मैदानावर खेळतात.
खो-खो वर्ल्ड कप 2025 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुषांचे 20 संघ तर महिलांचे 19 संघ स्पर्धेत सहभागी होतील.
• या स्पर्धेत सहा खंडांतील 23 देश सहभागी झाले.
• महासंघाने या स्पर्धेसाठी अधिकृत शुभंकर (Mascot Symbols) म्हणून काम करणाऱ्या हरिणांची गतिशील जोडी ‘तेजस’ आणि ‘तारा’ देखील अभिमानाने सादर केली.
• तेजस हा तेज आणि उर्जेचे प्रतीक आहे
• तारा हे मार्गदर्शन आणि आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करते.
• पुरुषांच्या विजेत्या संघाला निळ्या रंगाचा चषक (Trophy)
• महिलांच्या विजेत्या संघाला हिरव्या रंगाचा चषक दिला गेला.