
चालू घडामोडी 20, जानेवारी 2025 | 8वा वेतन आयोग | 8th Pay Commission

8वा वेतन आयोग
8th Pay Commission
Subject : GS - राज्यशास्त्र, अर्थशास्त्र
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
1. न्यायमूर्ती ए.के. माथूर
2. श्रीमती निर्मला सीतारमण
3. श्री मनमोहन सिंग
4. न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण
उत्तर : न्यायमूर्ती ए.के. माथूर (Justice A.K. Mathur)
बातमी काय आहे ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे.
• आठव्या वेतन आयोगामुळे 1.2 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये सुधारणा होणार आहे.
वेतन आयोग म्हणजे काय ?
• महागाई, आर्थिक परिस्थिती आणि बाजार दर लक्षात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांची पगार रचना, भत्ते आणि सेवानिवृत्तीचे फायदे यांचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करते.
• सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा महागाई आणि आर्थिक बदलांशी ताळमेळ घालण्यासाठी वेतन आयोग केंद्र सरकारला सुधारणा सुचवतात.
• वेतन आयोग ही एक सल्लागार संस्था (Advisory Body) आहे.
पहिला वेतन आयोग केव्हा स्थापन करण्यात आला ?
• पहिल्या वेतन आयोगाची स्थापन 1946 मध्ये करण्यात आली.
• वेतन आयोग साधारणपणे दर 10 वर्षांनी स्थापन करण्यात येतो.
वेतन आयोग कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करते ?
वेतन आयोग हा वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) अंतर्गत कार्यरत असतो आणि त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असतो.
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
• न्यायमूर्ती ए.के. माथूर हे 7 व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते.
• सातव्या वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली.
• तर सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्यात आला.
• 7 व्या वेतन आयोगामुळे 2016-17 च्या आर्थिक वर्षाच्या खर्चात ₹1 लाख कोटी जोडले गेले होते.
• 7 व्या वेतन आयोगाद्वरे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते.