
चालू घडामोडी 22, जानेवारी 2025 | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प | President of the United States : Donald Trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
President of the United States : Donald Trump
Subject : GS
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) नुकतेच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
ब) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही योग्य
4. अ आणि ब दोन्ही अयोग्य
उत्तर : अ आणि ब दोन्ही योग्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (राष्ट्रपती) यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
President of the United States :
• नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली.
• यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहे.
• यापूर्वी 2017 ते 2021 दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला आहे.
• 20 जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
• अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे अमेरिका देशाचे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख असतात.
• राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे सैन्यप्रमुख असतात.
• अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून निवडला जातो.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
• अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो.
अमेरिकेत एक व्यक्ती जास्तीत जास्त किती वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो ?
• अमेरिकेत एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा म्हणजेच 8 वर्षे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतो.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कार्यालय व निवासस्थानाचे नाव काय ?
• वॉशिंग्टन, डी.सी. ह्या अमेरिकेच्या राजधानीमधील व्हाइट हाउस (White House) हे राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे.
• जेम्स होबन (James Hoban) हे व्हाइट हाउस चे शिल्पकार (Architect) आहे.