
चालू घडामोडी 22, जानेवारी 2025 | विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली ? | Who is the champion of the Vijay Hazare Trophy ?

विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली ?
Who is the champion of the Vijay Hazare Trophy ?
Subject : GS - खेळ
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) विजय हजारे ट्रॉफी (2024-25) खालील पैकी कोणी जिंकली ?
1. सौराष्ट्र
2. कर्नाटक
3. विदर्भ
4. मुंबई
उत्तर : कर्नाटक
बातमी काय आहे ?
• कर्नाटकाने विदर्भावर अंतिम सामन्यात 36 धावांनी मात करून विजय हजारे ट्रॉफी जिंकली.
• गुजरात राज्यातील वडोदरा येथिल कोटाम्बी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला.
• कर्नाटकाने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली.

विजय हजारे ट्रॉफी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
विजेता संघ : कर्नाटक
कर्नाटकचा कर्णधार : मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
उपविजेता संघ : विदर्भ
विदर्भाचा कर्णधार : करुण नायर (Karun Nair)
टॉप परफॉर्मर्स
• मालिकावीर (Player of the Series) : करुण नायर (विदर्भ) स्पर्धेत ७७९ धावा.
• सर्वोत्कृष्ट गोलंदाज (Top Bowler) : अर्शदीप सिंग (पंजाब) 20 विकेट्स
विजय हजारे ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
• विजय हजारे ट्रॉफी ही भारताची प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.
• ज्याला महान क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव देण्यात आले आहे.
• विजय हजारे ट्रॉफीला रणजी वनडे ट्रॉफी म्हणूनही ओळखले जाते.
• खेळाडूंसाठी राष्ट्रीय निवडीसाठी त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
• विजय हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला.
• प्रथमश्रेणीत क्रिकेट मध्ये तिहेरी शतक (300) झळकावणारे विजय हजारे हे पहिले भारतीय फलंदाज होते.